VIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात
Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Trending Video : दिल्लीतील (Delhi Crime) हीट अँड रन (Delhi Kanjhwala case) अंजलीची मैत्री निधी हिच्या मृत्यूनंतर देशात एकच खळबळ माजली होती. या घटनेच्या सीसीटीव्ही (cctv) फूटेजमुळे अख्खा देश नवीन वर्षाच्या पहिल्यात दिवशी जबर धक्का बसला होता. ही घटना अजून ताजी असताना अजून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमध्येही एका कारने रस्त्यावरुन सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्याला धडक दिली. एवढंच नाही तर तब्बल 1 किलोमीटरपर्यंत त्या विद्यार्थ्याला फरफरटत नेल्याचं या व्हिडिओमध्ये (viral video) दिसतं आहे. हे दृश्यं पाहून अनेकांचे हृदयाचे ठोके चुकले (shocking incident) आहेत.
धक्कादायक व्हिडिओ
3 सेकंदच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कार भरधाव वेगाने येतं आहे. एक विद्यार्थींनी सायकलवरुन जात असते. कारचा वेग पाहता तिथे रस्त्याच्या एका कडेला बाजूला होते. दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आणि महिला असते. ती महिला वाचवा वाचवा असं ओरडतं असते. तर कार भरधाव वेगाने पुढे जात असते तर त्यामागे दोन व्यक्ती धावतं असतात. कारण ही कार एका विद्यार्थ्याला फरफटतं नेत असते. त्या मुलाचे जीव वाचविण्यासाठी ते दोन व्यक्ती जीवाची पर्वा न करता पळतं असतात. जेव्हा ही कार बाजारात पोहोचली स्थानिकांनी ती थांबली आणि त्या मुलाची सुटका केली. (Trending Video Another hit and run case after Delhi a student was carried away by a car for 1 KM Viral on social media)
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक लोकांनी घटनेनंतर कारची तोडफोड केली आणि कारचालकालाही मारहाण केली. सदैवाने या घटनेत विद्यार्थी जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी त्या चालकाला ताब्यात घेतलं आहे.
कुठे घडली घटना?
ही घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये (Uttar Pradesh's Hardoi) झबरा पुरवा या परिसरात घडली. तो विद्यार्थी कोचिंगसाठी जात असताना त्याचासोबत ही घटना घडली. पीडित मुलाचं नाव केतन असून तो नववीत शिकतो. ज्यावेळी केतन सायकलवरुन कोचिंगला जात असताना त्याला कारने धडक दिली आणि तो कारच्या चाकात अडकला. स्थानिकांनी त्वरित त्याला मदत केली म्हणून त्याचा जीव वाचला. तर कारचालकाचं नाव जितेंद्र शुक्कला असून पोलिसांनी त्याचा कारवाई केली आहे.