Metro Trending Video : मुंबईकरांची लोकल (mumbai local) आणि दिल्लीकरांच्या मेट्रोतील (Delhi Metro)  एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) पाहिला मिळतात. रील्स (Reels) बनवण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतं आहे. यातून रातोरात अनेक जण प्रकाशझोतात येतात. तर काही यूजर्स यातून पैसे कमवतात. तर फक्त प्रसिद्धीसाठी धोकादायक अगदी जीवाशी खेळ करणारे स्टंटही (Stunt Video) करतात. सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे रील्स दिसतात. एखाद्या ट्रेडिंग (Trending Video) गाण्यावरचा डान्स किंवा प्रँक व्हिडिओ हे नेटकऱ्यांना पाहिला आवडतात. 


आत्मविश्वास असावा तर असा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकरी हेच म्हणतोय आत्मविश्वास असावा तर या तरुणासारखा...या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण चक्क टॉवेल (towel) गुंडाळून मेट्रोमध्ये चढतो. अगदी कसलीही तमा न बाळगता न लाजता तो मेट्रोमध्ये बिनधास्त इकडे तिकडे फिरताना दिसतं आहे. त्याला पाहून मेट्रोमधील मुली लाजून पाणी पाणी झाल्या. तर मुलं त्याला असं टॉवेलमध्ये फिरताना पाहून आश्चर्यचकित झाले. (Trending Video boy wraring towel in delhi metro viral on social media)


 


हेसुद्धा वाचा - वरात घेऊन निघण्याआधीच लग्नघरातून निघाली अंत्ययात्रा; 5 स्फोटांत वरासह 60 जण गंभीरित्या भाजले


 


इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल


हा तरुण अचानक टॉवेलमध्ये मेट्रोमध्ये का चढला, तो का असा फिरतोय असा प्रश्न यूजर्सला पडला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं आहे की, ''टाकीतील पाणी संपलं आहे. आज ऑफिसमध्येच जाऊन आंघोळ करेल. '' हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील आहे.