Trending Video :  एका थरारक अपघाताचा (Car accident Video) व्हिडीओ समोर आला आहे. अतीप्रचंड वेगामुळे एका तरुणीला जखमी केलं आहे. रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने गाडी चालवल्यामुळे रस्त्यावर झोपणाऱ्या निष्पाप लोकांचे बळी गेल्याचा अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. मुंबईतील सलमान खान (Salman Khan hit and run case) हिट अँड रन प्रकरण आजही अनेकांना सुन्न करु जातं. त्यानंतर अनेक घटना समोर आल्या पण या वेगाला काही आळा बसला नाही. सध्या समोर आलेली घटना चंदिगढमधील (chandigarh girl accident) आहे. 


काय चूक होती तिची?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक अतिप्रचंड वेगाने कार येतं आहे. पुढे जाऊन ती कार टर्न घेते आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येते. रस्त्याच्या बाजूला एक तरुणी भटक्या कुत्र्यांना खायला घालतं असते. ती एक चांगल काम करत होती...पण तिने कधीही विचार केला नसेल की पुढच्या क्षणी आपल्यासोबत काय घडणार आहे याचा...त्या सुसाट कारने त्या तरुणीला धडक दिली आणि तो तिथून निघून गेला. या घटनेचं सीसीटीव्ही फूटजे पाहून अंगावर शहारा येतो.


धक्कादायक गोष्ट 


या दुदैवी अपघातात जखमी झालेल्या तरुणीचं नाव तेजस्विता आहे. ती तरुणी दर शनिवारी तिच्या आईसोबत भटक्या कुत्र्यांना खायला द्यायला येयची. त्यादिवशी पण ती कुत्र्यांना खायला देत असताना ही घटना घडली. ही घटना गेल्या शनिवारी 14 जानेवारीला घडली आहे. (Trending video chandigarh girl dog feeding car hit and run case cctv footage viral on Social media)



पोलिसांवर कुटुंबाचा आरोप


या घटनेनंतर तेजस्विताच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांचा मते, पोलिसांना हे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी दिल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. त्यामुळे या घटनेची नोंद 16 जानेवारीला झाली आहे.  दरम्यान या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.