Couple Falls Off During Wedding Photoshoot : देशभरात लग्नाचा माहोल सुरू आहे. अनेक ठिकाणी लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत. सोशल मीडियावर (Social media) देखील लग्नाचा फिव्हर (wedding festive) दिसून येत आहे.कारण लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लग्नाच्या दिवशी नवरा-नवरी रोमँटिक फोटोशूट करत आहेत. हे फोटोशूट करताना हे जोडप पडल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात.यात काही व्हिडिओ हे डान्सचे असतात, तर काही व्हिडिओ रितीरिवाजसंबंधित असतात. असाच एक लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत लग्नादरम्यान फोटोशूट करताना जोडप्यांचा मोठा घोळ झाला होता. हा घोळ कॅमेरात कैद झाला होता. याचाच व्हिडिओ आता समोर आला आहे. 


व्हिडिओत काय?


व्हायरल झालेल्या (Video Viral) लग्नाच्या व्हिडिओत, नवरा-नवरी यांनी लग्नाचे आऊटफिट परिधान केले आहेत. या सुंदरशा आऊटफिटमध्ये ते रोमँटिक फोटोशूट करत आहेत. हे फोटोशूट करत असताना नवरा-नवरी डान्स करत असतात. या दरम्यान नवरीचा पाय घसरतो आणि ती जमीनीवर पडते. तर तिचा हात धरून असलेल्या नवऱ्याचा देखील तोल जातो आणि देखील कोसळतो. यानंतर ते दोघेही लाजतात.ही संपुर्ण घटना लग्नाच्या कॅमेरात कैद झाली आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 



हा व्हिडिओ jaipur_weddings नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 9 मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर 5 लाखाहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडिओवर (Social media) लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.