Cheer Girl Trending Video : सध्या आयपीएल 2023 (IPL 2023 News) धूम सुरु आहे. आयपीएलचा थरार आता उच्चांग स्तरावर पोहोचला आहे. IPL 2023 शनिवारी दिल्लीतील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) हवामानामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. देशभरातील कोट्यावधी क्रिकेटप्रेमी आयपीएलचा थरार पाहण्यात व्यस्त आहेत. स्टेडियममधील दोन संघातील सामना, खेळांडूची एकमेकांशी मस्ती पासून अनेक वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आयपीएलमधील विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामधील वाद सध्या चर्चेत आहे. क्रिकेट म्हटलं तर सामन्यातील थरारशिवाय Cheer Girl हा पण महत्त्वाचा विषय...छोटे छोटे शॉट स्कर्ट (Cheerleaders) घालून सुंदर अशा तरुणी चौका आणि सिक्स मारल्यानंतर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी डान्स करतात. चीअर गर्ल्स खेळाडूंमधील चैतन्य वाढवण्यात गुंतलेल्या असतात. त्यांचा हा जबरदस्त परफॉर्मन्सने क्रिकेटप्रेमीही घायाळ होतात. (Trending Video desi cheer girl village premier league video viral on Social media ipl 2023)


क्रिकेट हा गल्लीबोळ्यातून मोठ्या उत्साहात खेळला जातो. पण आम्हाला सांगा तुम्ही कधी गावातील चीअर गर्ल पाहिली आहे का? सोशल मीडियावर गावातील एका प्रीमियर लीगमधील 'Cheer Girl' चा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतात खुल्या मैदानात एका मंडपाखाली लाल रंगाची साडी नेसून नाचताना दिसतं आहे. तर शेजारी बसलेले प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत. 



हा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्जचा मॅचदरम्यानचा आहे. तर तो चाहत्या चेन्नईला सपोर्ट करायला आला होता. मॅच तर सोडा या चाहत्याची सर्वत्र चर्चा होते आहे. तो व्यक्ती जसा हावभाव करत आहे तसाच चीअर लीडर्स करत आहेत. हा व्हिडीओ ट्वीटरवर Out Of Context Cricket या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.