मुंबई : सोशल मीडियावर नेहमी कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. कधी कोणत्या लग्नातला तर कधी कोणी स्टंट करताना. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत. कोणत्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रेन गेल्यावर त्याचं काय होईल याचा तुम्ही विचार करू शकता, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


आणखी वाचा : Vicky kaushal नं सार्वजनिक ठिकाणी पत्नी कतरिनाला केला असा इशारा, नेटकरी म्हणाले 'नक्की काय करायचं होतं...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत एका व्यक्तीच्या अंगावरून ट्रेन गेली पण त्याला काहीही झालं नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ही व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये असलेल्या जागेत लपला आहे. उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील भरठाणा रेल्वे स्थानकावर इंटरसिटी ट्रेनचे 17 डब्बे त्या व्यक्तीच्या अंगावरून गेले. तरी देखील त्याला काही झालं नाही. या व्यक्तीचं नाव भोला सिंग आहे. भोला सिंगला काही झालं नाही आणि ट्रेन गेल्यानंतर तो उठून उभा राहतो. हा एक प्रकारचा चमत्कार आहे.


आणखी वाचा : बॉलिवूडमध्ये अजून एण्ट्री पण नाही तरी Attitude? Viral Video पाहून नेटकऱ्यांनी शहनाझला केलं ट्रोल



आणखी वाचा : कोणत्या ग्लासमध्ये सगळ्यात जास्त पाणी? 99% लोक अचूक उत्तर देण्यात अपयशी


आग्रा फोर्ट-लखनऊ जंक्शन इंटरसिटीच्या जनरल सेक्शनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात भोला सिंग रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली. घटनेच्या संदर्भात भरठाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी राम बाबू सिंह म्हणाले, 'ट्रेन स्टेशनवरून निघत होती, भोला ती पकडण्यासाठी धावला. ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. मात्र चमत्कारिकरित्या वाचला.  त्याला एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं, जिथे त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले.' हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतं आहे.