बॉलिवूडमध्ये अजून एण्ट्री पण नाही तरी Attitude? Viral Video पाहून नेटकऱ्यांनी शहनाझला केलं ट्रोल

शहनाझचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 10, 2022, 03:59 PM IST
बॉलिवूडमध्ये अजून एण्ट्री पण नाही तरी Attitude? Viral Video पाहून नेटकऱ्यांनी शहनाझला केलं ट्रोल title=

मुंबई : 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) फेम अभिनेत्री आणि गायिका शहनाझ गिल (Shehnaaz Gill) सध्या खूप चर्चेत आहे.  शहनाझनं सलमान खानच्या (Salman Khan) रिअॅलिटी शोमध्ये मनोरंजन करत प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉसमधून लोकप्रियता मिळाल्यानंतर शहनाझला एकामागे एक नवे प्रोजेक्ट्सची ऑफर मिळते. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाझनं स्वत: चं लक्ष कामात केंद्रित केलं. अलीकडेच शहनाझचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शहनाझचा Attitude पाहून तिचे चाहते नाराज झाले आहेत.

आणखी वाचा : Vicky kaushal नं सार्वजनिक ठिकाणी पत्नी कतरिनाला केला असा इशारा, नेटकरी म्हणाले 'नक्की काय करायचं होतं...'

शहनाझचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टाबझनं शेअर केला आहे. या व्हिडीओत शहनाझ सेटवरून तिच्या व्हॅनिटी व्हॅनकडे जाताना दिसते. त्याचवेळी पापाराझी तिला फॉलो करतात आणि पोज देण्यास सांगतात. यावर पोज देण्याच्या जागी शहनाझ आता काम आहे, तर नंतर पोज देईन, असं बोलते. 

आणखी वाचा : Queen Elizabeth II नं वापरलेल्या Tea Bag चा लिलाव, किंमत ऐकूण व्हाल थक्क

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : IAS Tina Dabi नी स्टेजवर जाताच काय केलं? प्रेक्षकांनी पाहताच...

 मात्र, यावेळी पापाराझींनी शहनाझला ती कशी आहे, असे विचारले.  या प्रश्नावर शहनाझ मागे वळून म्हणाली, 'तिची तब्येत बरी नसेल तर तुम्ही मला औषध आणून द्याल का?'  आता व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना वाटलं की शहनाझचा हा Attitude चांगला नाही.  

आणखी वाचा : मुलांसोबत Brahmastra सिनेमा पाहणं हृतिकला पडलं महागात, चाहत्याच्या अशा कृत्यामुळे भडकला अभिनेता

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याला शहनाझला ट्रोल केले जात आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, Attitude तर पाहा. दुसरा नेटकरी म्हणाला, 'इतकं बोलायची काही गरज नव्हती'. एवढंच काय तर शहनाझ  बेशिस्त आहे, असे ही म्हणत आहेत. 

आणखी वाचा : शनिवारी करा शनिदेवात्या 'या' मंत्रांचा जप, सर्व संकट होतील दूर

शहनाज लवकरच  'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात सलमान खान आणि शहनाज गिल व्यतिरिक्त पूजा हेगडे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.