Crime Story : सोशल मीडियावर (Social media Video) एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एका महिलेला मंदिरातून एक व्यक्ती केस ओढून बाहेर काढताना दिसतं आहे. पूर्वी जाती - धर्मावरुन उच्च प्रतीची लोक मंदिरात (temple Video) काही धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना मंदिरात मज्जाव करायचे. मात्र जग बदलं आहे, आज समाजात आपण धर्माचा पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करतो. मग त्या महिलेला अशी वागणूक का दिली जातं आहे, असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतात. 


अमानुषपणाचा कळस! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मंदिरात चार पुरुष आहेत आणि एक महिला आहे. एक व्यक्ती त्या महिलेवर ओरडत आहे. त्या व्यक्तीने त्या महिलेचे केस धरले ओढण्यास सुरु केली. संतापजनक म्हणजे त्या व्यक्तीने केस धरुन महिलेला मंदिराबाहेर फरफरटत नेलं. एवढंच नाही, आपली तळमस्तकातील आग डोक्यात जाते जेव्हा आपण पुढे पाहतो तो व्यक्ती मंदिराबाहेर त्या महिले फेकतो आणि तिला मारहाण करतो. तो निर्दय व्यक्ती इथेच थांबला नाही, मंदिर परिसरात बाजूला ठेवलेला काठी उचलून आणतो आणि त्या महिलेला मारायला जातो. हा सगळा प्रकार मंदिरात असलेले पूजारी पाहत होते. हा अमानुष प्रकार देवाच्या दारात होतं होता. पण पुजारी त्या महिलेची मदत करत नव्हते. (trending video karnataka dalit woman dragged beaten at temple Crime Story Viral on Social media marathi news)


कुठे घडली आहे घटना?


मिळालेल्या माहितीनुसार ती महिला दलित होती. ही घटना बंगळुरुच्या अमृतहल्ली परिसरातील 21 डिसेंबरला एका मंदिरात घडली आहे. पीडित महिले मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात IPC कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महिलेचा काय गुन्हा?


दरम्यान महिलेने दावा केला की, भगवान व्यंकटेश्वर हे तिचे पती आहे आणि तिला मंदिरात त्यांचा शेजारी बसायचं आहे. तिच्या या मागणीला मंदिरातील पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला. तरीही ती महिला तिच्या मागणीवर ठाम होती. महिला ऐकत नाही हे पाहून मंदिरातील व्यक्तीने त्या महिला मारहाण करण्यास सुरुवात केली. 



हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळी आहे.