VIDEO : मुकेश अंबानींची सून राधिका आलियाच्या गाण्यावर थिरकली, मेहंदी सोहळ्यात एकच जल्लोष
Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांचा लाडका लेक अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अंबानींच्या लहान सूनबाईचे मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Anant Ambani and Radhika Merchant Mehendi Functio Trending Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि वीरेन मर्चंट (Viren Merchant) यांची लेक राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचं लवकरच लग्न होणार आहे. मंगळवारी राधिकाचा मेंहदी सोहळा जोरदार पार पडला. सोशल मीडियावरही राधिकाच्या सोहळ्याने रंगत आणली होती. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
'घर मोरे परदेसीया'
राधिका मर्चंटने मेंहदी सोहळ्यासाठी खास गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला होता. या आऊटफीटमध्ये राधिका एका सुंदर परीसारखी दिसतं होती. राधिकाने जी ज्वेलरी घातली होती त्यात तिचं रुप खुलून दिसतं होतं. या सोहळ्यात राधिकाने आलिया भट्ट (alia Bhatt) हिच्या ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोहे परदेसिया’ या गाण्यावर नृत्यू केलं. राधिका एक उत्तम नृत्यांगणा आहे. या सोहळ्याचे प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ सासू नीता अंबानी यांनी त्यांचा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Trending video Nita Mukesh Ambani anant ambani and radhika merchant mehendi function Ghar Mohe Pardesia dance video viral on Social media )
ग्रँड सोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गेल्याच महिन्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर मुंबईत एका ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनंत अंबानी आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. अनंत यांनीही राधिकाच्या मेंहदी सोहळ्यातील डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर केला आहे.
कोण आहे राधिका मर्चंट?
राधिका ही मुकेश अंबानी यांचे जवळचे मित्र वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. तर राधिकाने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर मिळवली आहे. राधिकाने 2017 मध्ये Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहिलं आहे.