मुंबई : सोशल मीडिया साइटवर तुम्ही काहीही टाका ते लगेचच लोकांकडून पसंत केलं जातं. त्याचबरोबर काहा व्हिडीओ इतके चांगले असतात की, ते ट्रेंड बनू लागतात आणि एकामागोमाग एक लोकं त्या ट्रेंडला कॉपी करुन आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील शेअर करतात. सध्या नवरा-बायकोंमधील वाद, विनोद आणि ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओंचा ट्रेंड हिट होत आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर एका जोडप्याचा मजेदार व्हिडीओ  व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ खरोखरचं खूप विनोदी आणि मजेदार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रेंडिंग व्हिडीओच्या सुरुवातीला पत्नी स्वयंपाकघरात नाईट सूट घालून काम करताना दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पती बायकोला विचारतो, तु घरी तयार होऊन चांगले कपडे घालून का राहत नाही? यावर उत्तर देत बायको तिचा संपूर्ण लूक बदलते. ज्यामध्ये ती घरातील काम करताना तर दिसते परंतु ती साड्यांमध्ये आणि जड दागिन्यांमध्ये दिसते. जसे आपण टीव्ही सिरियलमधील सूनांना काम करताना पाहातो.


या ट्रेंडिंग व्हिडीओमध्ये या महिलेचे परिवर्तन पाहून सर्वांना आश्चर्य वाटते. या महिलेचा लूक टीव्ही अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. ती साडी आणि जड दागिन्यांमध्ये झाडू करताना, स्वयंपाक करताना दिसते, त्यानंतर शेवटी ती जड साडी आणि देगिने घालून झोपतानाही दिसते. तुम्ही टीव्ही सीरियलचे चाहते असाल, तर तुम्ही टीव्हीमधील अभिनेत्रींना अनेक वेळा असेच काम करताना किंवा जड साडीमध्ये झोपताना पाहिले असेल.


परंतु तसे पाहाता जड साडी आणि जड दागिन्यांमध्ये घरचे सगळे काम करणे अशक्य आहे. यामुळे काम करता तर शक्य होत नाहीच, परंतु त्यामुळे थकायला देखील होते. खरे सांगायचे झाले तर महिलांना असे कपडे आणि देगिने घालून फिरायला तर फार आवडते परंतु त्यामध्ये ते घरचे काम करु शकत नाहीत आणि हेच सत्य आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ इंस्टाग्राम रीलवर दुल्हनिया डॉट कॉम अकाउंटवर शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 22 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. यावर लोकं भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. खास करुन महिला वर्गाने यावर त्यांचा साडी घालून काम करण्याचा अनुभव कसा आहे किंवा त्यांना काय वाटतं हे सांगितलं आहे.