Video : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...
Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...
Trending Video : एकीकडे आपण प्रगती आणि 5G च्या गोष्टी करत आहोत. पण आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या राज्यात रुग्णाला उपचारासाठी दारोदारी भटकावे लागतं आहे. गर्भवती महिलेचा एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतं असून आरोग्यमंत्री (minister of health) कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जातो आहे.
काय घडलं नेमकं ?
एक गर्भवती महिला (Pregnant women) या रुग्णालयातून त्या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी गयावया करत होती आणि डॉक्टर (Doctor) तिला बाहेरचा रस्ता दाखवत होते. एका खाजगी रुग्णालयाकडे जाताना या गर्भवती महिलेला वेदना सुरु झाल्या. मग काय रस्त्याच्या कडेला चादर लावून प्रसूती करण्याची वेळ आली. या महिलेने मुलीला जन्म दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेसुद्धा वाचा - Govar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची
कुठली आहे घटना?
ही धक्कादायक घटना बिंदकी कोतवाली परिसरातील दरवेशाबाद इथली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेसंदर्भात डॉक्टरांशी संपर्क साधल्या असता. त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला इतर रुग्णालयात जाण्यास सांगितलं अशी कारणं दिली आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी अहवाल मागविला आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. (Trending Video Shocking Running from this hospital to that hospital for treatment finally the pregnant woman baby girl born on road viral on social media)
महाराष्ट्रादेखील वाडा आणि पालघर रस्त्या नसल्याने अनेक वेळा प्रसूतीसाठी महिलेंना बैलगाडी किंवा कधी छोळीतून घेऊन जाण्याचा घटना आपण पाहिल्या आहेत.