Govar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची

Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे.   

Updated: Dec 7, 2022, 11:59 AM IST
Govar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची  title=
Mission Measles Fight Measles After Corona See For Whom Vaccine Is Very Important The challenge of vaccination nmp

Gover Rubella Vaccination in Maharshtra : अख्खा जगाला दोन वर्ष कोरोनाच्या महासंकटाने विळखा घातला होता. त्यातून आता कुठे सगळं पूर्वपदावर येतं आहे. अशातच महाराष्ट्रावर नवीन संकट ओढवलं आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये गोवरचा उद्रेक  (Measles Outbreak)  झाला आहे. गोवरचा सगळ्यात मोठ्या धोका हा लहान मुलांना आहे. अशात गोवरशी (Measles)  लढण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. गोवरवर मात करण्यासाठी लसीकरण हेच एक शस्त्र असल्याने मिशन गोवर हातात घेण्यात आला आहे. 

गोवर लसीकरण मोहीमचं आव्हान 

राज्य कृतिदलाकडून गोवरला प्रतिबंध (Health News)  करण्यासाठी राज्यामध्ये दोन टप्प्यांममध्ये लसीकरण (Measles vaccine)  होणार आहे. या मोहीमतर्गंत नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एकही लशीची मात्रा न घेतलेल्या बालकांवर लक्षकेंद्रीत करण्यात येणार आहे. पहिला टप्प्या 15 ते 30 डिसेंबर तर दुसरा टप्पा हा 15 ते 26 जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे. राज्य कृतिदलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके दिलेल्या माहितीनुसार या दोन टप्प्यात बालकांना डिसेंबरमध्ये पहिली मात्रा तर जानेवारीमध्ये दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. 

मिशन गोवर!  (Mission Measles) 

विशेष म्हणजे राज्यात गोवर - रुबेलासाठी विशेष लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभिनयांनासाठी राज्यभरातील बालकांची (measles child) गणना केली जाते आहे. जिल्हा, तालुका, पालिका आणि नगरपालिकासह विभागनिहाय अगदी वॉर्डनिहाय बालकांची मोजणी केली जातं आहे. या अभियानातर्गंत एकही लस न घेतलेल्या बालकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मिशन गोवर 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार आहे. 

इतका साठा उपलब्ध

सध्या राज्यामध्ये 13 लाख 53 हजार 820 लशींचा साठा उपलब्ध आहे. यामध्ये जिल्हास्तरावर 11 लाख 55 हजार 570, विभागीय स्तरावर 1 लाख 19 हजार 250 आणि राज्य स्तरावर 79 हजार इतका लससाठा आहे.

सर्वेक्षण पथकं -1237

‘जीवनसत्त्व अ’ची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या - 36,399

आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेली घरं - 14,83,528

गोवर-रुबेला पहिली लस मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या - 15,490

गोवर-रुबेला दुसरी लस मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या - 9,277

 

हेसुद्धा वाचा - Mumbai Air Pollution : मुंबईत आजारपणाची 'हवा'; वेळीच सावध व्हा!

मुंबईत आतापर्यंत रुग्णसंख्या (Measles in Mumbai)

मंगळवारी मुंबईमध्ये गोवरचे आठ रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 420 झाली आहे, तर 71 संशयित रुग्ण सापडल्याने संशयित रुग्णांची संख्या 4 हजार 658 झाली आहे. मंगळवारी 28 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

रुग्णांच्या चाचण्यांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा

गोवर रुग्णांच्या घशातील स्रावाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी सध्या राज्यात कोणतीही प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे गोवरला प्रतिबंध करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी राज्यात स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

काय आहेत गोवरची लक्षणे? 

- ताप येणे
-  खोकला लागणे
-  घसा दुखणं
- अंग दुखणं
-  डोळ्यांची जळजळ होणं
-  डोळे लाल होणे
- 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येणं

गोवरचा धोका कोणाला आहे?

ज्या बालकांना लस देण्यात आलेली नसते अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसेच लसीकरण न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवर होऊ शकतो.