Viral video News : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे खूप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत थंडी वाजत असल्या कारणाने एका तरूणाने बाईकवर आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सर्वत्रच थंडीने हुडहुडी भरली आहे. त्यामुळे दररोज सकाळी नागरीक आग लागून शेकोटी घेतायत. तर काही लोक स्वेटर घालून थंडीपासून स्वत:चा बचाव करताना दिसत आहेत. थंडीपासून बचावाचा असा सर्व प्रयत्न सूरू असताना, आता एक व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे. या व्हिडिओत काही तरूणांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी चालत्या बाईकवरच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल होत आहे. 


व्हिडिओत काय? 


व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक बाईकस्वार दुचाकी चालवत आहे. या दुचाकी स्वाराच्या मागे त्याचा मित्र बसला आहे. हे दोघेही रात्रीच्या थंडीत बाईकने प्रवास करत आहेत. या प्रवासा दरम्यान त्याला खुप थंडी वाजत आहेत. या थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तरूणाने थेट दुचाकीवरच आग लावली आहे. खरं तर एक तरूण गाडी चालवत आहेत. तर दुसरा तरूण त्याच्यामागे उलटा बसला आहे. या उलट्या बसलेल्या तरूणाने एका स्टोव्हमध्ये आग लावली आहे. हा स्टोव्ह त्याने गाडीच्या मागे अडकवला आहे. या स्टोव्हमधून येणाऱ्या आगीतून तो शेक घेत आहेत. अशाप्रकारे त्याने थंडीपासून वाचण्याची युक्ती लढवली आहे. तरूणाच्या या स्टंटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.



 
मध्यप्रदेशमधला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून त्यांनी तरूणांचा शोध सुरु केला आहे. हा व्हिडिओ इंदूरच्या विजय नगर भागातील असल्याचा दावा केला जात आहे. तसेच हा व्हिडिओ 18 जानेवारीच्या रात्रीचा आहे. रोहित वर्मा असे बाईकवर आग लावलेल्या मुलाचे नाव असून तो एक अनोखी रील बनवताना वाहतुकीचे नियम विसरला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. 


दरम्यान हा व्हिडिओ (Video Viral) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडिय़ावर चर्चा आहे.