मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. आता असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अजगराने (Python Video) एका व्यक्तीच्या गळ्याला फासा सारखा वेढा घेतला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.  


व्हिडिओत काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काही तरूण मासेमारी करताना दिसत आहे. ही मासेमारी करत असताना त्यांना अजगर सापडतो.एक मद्यधुंद व्यक्ती या अजगराला मासा समजुन पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र हा अजगरच (Python Video) आपल्या शेपटीने त्या व्यक्तीचा गळ्याभोवती स्वत:ला गुंडाळून घेतो. त्यामुळे त्या व्यक्तीला फास बसतो, असे या व्हिडिओत दिसत आहे.  


अजगराचा (Python Video) हा फास इतका टाईट असतो की कितीही प्रयत्न केले तरी तो सुटत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे मित्र त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तो फास काही सुटत नाही.आणि त्या व्यक्तीची अवस्था खुपच बिकट होते. 


हा व्हिडिओ झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस अजगरापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अजगराने त्या माणसाच्या गळ्याला पूर्णपणे पकडले आहे.तसेच त्याच्यासोबतचे व्यक्ती त्याला सोडवताना दिसत आहे.  @NarendraNeer007 नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. सध्या हा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.