Viral Video : देशभरात लग्नाचा (Marriage) माहोल सुरु आहे. जागोजागी लग्नाचे मंडप दिसतायत, ढोल वाजतायत अस एकंदरीत वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे अनोखे व्हिडिओ (Video Viral) देखील व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : चर्चा तर होणारच...भावाने अख्ख Stock Market च लग्न पत्रिकेवर उतरवल 


लग्नाचा (Marriage) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरा-नवरीने हूक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. याआधी देखील नवऱ्याने नवरीला लग्नमंडपात किस केल्याच्या अनेक व्हिडिओ समोर आल्या आहेत. मात्र या कपलने युनिक पद्धतीने हुक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. त्यामुळे या कपलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  


व्हिडिओत काय? 


व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, मस्त लग्नाचा वातावरण आहे. नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत. नवरीने मरून कलरचा लग्नाचा आऊटफिट घातला आहे. तर नवऱ्याने सुट परिधान केला आहे. य़ा दरम्यान नवरी पाईप घेते आणि हुक्का (Hookah Kiss)  ओढते. हा हुक्का ओढून झाल्यावर ती नवऱ्याला किस (Hookah Kiss) करते. हे किस केल्यानंतर दोघेही हवेत धूवा सोडतात. अगदी अनोख्या पद्धतीने संपुर्ण लग्न मंडपासमोर त्यांनी हे किस केल आहे. हा  व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताच यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी या कपलचे कौतूक केले आहे. तर अनेकांनी प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचे किस (Hookah Kiss)  केले असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओला अपलोड करताच 60 हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.  



या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. तसेच या व्हिडिओवर (Video Viral) लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.