Viral News : देशभरात लग्नसोहळ्याचे (wedding) वातावरण आहे. ठिकठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत, लग्नाची वरात निघतेय, असे सर्व प्रसन्न वातावरण आहे. या सर्वात कधी कधी लग्न पत्रिका देखील भाव खाऊन जाते.कारण काही कपल इतकी हटके लग्नपत्रिका बनवतात, की त्याची चर्चाच सोशल मीडियावर रंगते.अशीच एक पत्रिका आता सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे.या पत्रिकेची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.
दरवर्षी लग्नसमारंभात हटके लग्नपत्रिका (wedding card) बनत असतात. अनेक कपल्स असे असतात, ज्यांना अशी हटके पत्रिका बनवण्याची क्रेझ असते. अशाच एका महाराष्ट्राच्या नांदेडमधील एका कपलने आता हटके लग्नपत्रिका बनवली आहे. ही लग्नपत्रिका (wedding card) स्टॉक मार्केट इंडियाने (Stock Market India) इंस्टाग्राम पेजवरून सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "शेअर मार्केटचा कट्टर चाहता असलेल्या डॉक्टरचे लग्नाचे आमंत्रण कार्ड... हिंदीत पहिली ओळ वाचा.
हे ही वाचा : तेरा प्यार प्यार हुक्का मार! नवरा-नवरीने भर लग्नमंडपात हुक्का पिऊन केल KISS,पाहा व्हिडिओ
ऐरवी लग्न पत्रिकेवर देवाचे नाव आणि लग्न सोहळ्याची माहिती दिलेली असते.मात्र ही लग्न पत्रिका शेअर मार्केटच्या बोली भाषेत बनवली गेली आहे. या बोली भाषेवर व्यवस्थित लक्ष दिल्यास तुम्हाला ही लग्न पत्रिका कळणार आहे.
व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेत नवऱ्याचे नाव डॉ. संदेश आणि नवरीचे नाव डॉ. दिव्या असे एकेरी लिहले आहे, पण त्यांच्या नावात आणखी काहीतरी जोडले गेले आहे.वराच्या नावापुढे Medicine Limited आणि वधूच्या नावापुढे Medicine Limited लिहिले आहे. म्हणजेच वराचे नाव डॉ. संदेश मेडिसिन लिमिटेड आणि वधूचे नाव डॉ. दिव्या ऍनेस्थेसिया लिमिटेड असे कार्डवर लिहिले आहे.
कार्डच्या सुरूवातीला म्हणजे वरच्या स्थानी दिग्गज स्टॉक मार्केट (Stock Market) गुंतवणूकदार राकेश झुनझनवाला, वॉरेन बफेट आणि हर्षद मेहता यांची नावे लिहली आहेत. यानंतर कार्डमध्ये इंग्रजीमध्ये IPO लिहिले जाते, ज्याला शेअर बाजाराच्या भाषेत इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात, परंतु या कार्डमध्ये Invitation of Precious Occasion लिहिलेले आहे. शब्दखेळ करून त्यांनी हे लग्नाचे आमंत्रण असल्याचे म्हटले आहे.
लग्न समारंभासाठी (wedding card) सूचीकरण समारंभ, मित्र आणि गुंतवणूकदारांसाठी किरकोळ गुंतवणूकदार, स्टॉक एक्स्चेंजच्या (Stock exchange) ठिकाणी लग्नाचे ठिकाण देण्यात आले आहे. तसेच लग्नाच्या प्रत्येक विधींना शेअर बाजाराच्या दृष्टीने देखील संबोधले गेले आहे, जसे की 'संगीत' रिंगिंग बेल, 'रिसेप्शन' 'अंतरिम लाभांश पेआउट' आणि 'फेरस' 'लिस्टिंग सेरेमनी' म्हणून. लग्नाच्या ठिकाणाला 'स्टॉक एक्सचेंज' असे नाव देण्यात आले आहे.
ही लग्न पत्रिका (wedding card) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या लग्न पत्रिकेची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.