मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. या व्हिडिओत शाळकरी मुलींनी (Girls Video) इतकी धमाल उडवून टाकलीय, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी हसू आवरता येत नाही आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स बनवून अनेक लोक रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनतायत. असाच प्रयत्न या शाळकरी मुलींनी केला आहे.आणि हा त्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे हा व्हिडिओ पाहून तरी कळत आहे. कारण सध्या या दोन चिमुकल्यांची रील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 


व्हिडिओत काय?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, शाळेच्या गणवेशातील (School Girls Video) दोन लहान मुली एका क्लासिक बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या तुटलेल्या दाताने अप्रतिम अभिनय करत आहे, ज्याला यूजर्सची खुप पसंती मिळत आहे.


1955 मध्ये आलेल्या 'मिस्टर अँड मिसेस 55' (Mr.& Mrs. 55) चित्रपटातील 'जाने कहां मेरा जिगर गया जी' (jane kaha mera jigar gaya ji) गाण्यावर दोन बहिणी जबरदस्त एक्सप्रेशन देताना नाचताना दिसत आहेत. गीता दत्त आणि मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांच्या आवाजात गायलेले हे क्लासिक हिट गाणे सगळ्यांनाच भुरळ पाडते. व्हिडिओतील मुलींचा डान्स आणि त्यांचे एक्सप्रेशन सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत.



दरम्यान या मुलींच्या वडिलांनी स्वतः इन्स्टाग्रामवर त्यांच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होत असलेली ही इंस्टाग्राम रील सध्या सोशल मीडियावर (Social media) युजर्सची मने जिंकत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत प्रचंड लाईक्स आणि कमेंट आल्या आहेत.