नवी दिल्ली : त्रिपुरा हे राज्य भारताच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ असलेलं एक राज्य आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबर १९४९ ला त्रिपुरा भारतात सहभागी झालं होतं. १९ व्या शतकातील महाराजा वीरचंद्र किशोर माणिक्‍य बहादुर यांच्या शासनकाळात त्रिपुरामध्ये नव्या युगाची सुरुवात झाली होती. त्यांनी यानंतर त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अनेक बदल केले. त्यांच्या वंशजांनी १५ ऑक्टोबर १९४९ पर्यंत या राज्यावर शासन केलं. त्यानंतर त्रिपुरा भारताचा भाद बनला होता. सुरुवातीला हा भाग-सी च्या अंतर्गत येणारं राज्य होतं आणि १९५६ मध्ये हे राज्‍य केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९७२ मध्ये त्रिपुराला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. त्रिपुरा बांग‍लादेश आणि म्‍यानमार यांच्या जवळ नदी खोऱ्यात वसलं आहे. या राज्याच्या तीन्ही बाजुला बांगलादेश तर एका बाजुला आसाम आणि मिझोराम हे राज्य आहे.


त्रिपुराचा उल्लेख महाभारत, पुराण तसेच अशोकाच्या शिलालेखातही पाहायला मिळतो. स्वातंत्र्यानंतर भारतीय गणराज्यमध्ये सहभागी होण्याआधी येथे राजेशाही होती. उदयपुर ही याची राजधानी होती. राजा वीर चंद्र माणिक्य महादुर देववर्मा यांनी हे राज्य ब्रिटिश भारत शासनानुसार चालवंल. गणमुक्ती परिषदेच्या आंदोलनानंतर १९४९ मध्ये हे भारतात सहभागी झालं. १९७१ मध्ये बांगलादेश निर्माण झाल्यानंतर येथे सशस्त्र संघर्ष सुरु झाला. त्रिपुरा नॅशनल वॉलेंटियर्स, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा अशा संघटनांनी स्थानिक बंगाली लोकांना येथून काढण्यासाठी मोहिम सुरु केली.


राजा त्रिपुर, जे ययाति वंशजाचे ३९ वे राजा होते. त्यांच्या नावावरच या राज्याचं नाव ठेवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे स्थानिय देवी त्रिपुर सु्ंदरी यांच्या नावावर देखील या राज्याचं नाव ठेवल्याचं लोकं म्हणतात. हिंदू धर्माचे ५१ शक्तीपीठ मधील हे एक शक्तीपीठ आहे. इतिहासकार कैलाश चंद्र सिंह यांच्यामते हा शब्द स्थानिय कोकबोरोक भाषेच्या २ शब्दांचं मिश्रण आहे. त्वि आणि प्रा. त्विचा अर्थ पानी आणि प्राचा अर्थ जवळचा असा होतो. प्राचीन काळात हे समुद्राच्या जवळ असल्याने यावरुन असं नाव ठेवण्यात आल्याचं देखीव म्हटलं जातं.


त्रिपुराची स्थापना 14व्या शतकात माणिक्य नावाच्या इंडो-मंगोलियन आदिवासी समाजाच्या प्रमुखाने केली होती. ज्यांनी हिंदू धर्म स्विकारला होता. १८०८ मध्ये ब्रिटिशांनी हा भाग जिंकला होता. त्रिपुराचा अर्ध्याहून अधिक भाग हा जंगलांच्या मध्ये आहे. जो निसर्ग प्रेमींनी आकर्षित करतो. पण येथे अनेक उग्रवादी संघटना तयार झाल्याने या भागाला पर्यटनाचा फायदा होऊ शकला नाही. वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी या उग्रवादी संघटना राज्य शासनाच्या विरोधात कारवाई करत असतात. 


त्रिपुरामध्ये २५ वर्ष डावा पक्ष सत्तेत होता. पण आता राज्यात भाजपचं सरकार आलं असून विप्लवकुमार देव त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत.