Viral Video: टर्की आइसक्रिमचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. या व्हिडीओत एक बाब तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे आइसक्रिम सहजासहजी मिळत नाही. विक्रेत्या त्याच्या शैलीत ग्राहकांना वेठीस धरतो. कधी हातात फक्त आइसक्रिमचा कोन देतो, तर कधी हातातून आइसक्रिम हिरावून घेतो. टर्की आइसक्रिमचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असं असताना एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. इतकंच काय तर लहानग्याने विक्रेत्याला धडा शिकवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. टर्की आइसक्रिम विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे मज्जा घेतल्यानंतर अखेर या मुलाने बदला घेतला असे कॅप्शन देखील दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आईस्क्रीम विक्रेत्याने मुलासोबत कृत्य करण्याचा प्रयत्न करताच त्याला तोंडघशी पाडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. विक्रेत्याने आइसक्रिम देण्यासाठी स्टिक पुढे करताच त्या मुलाने स्टिक घट्ट पकडून ठेवली. इतकं काय तर त्याच्या हातून सोडवून घेण्यासाठी प्रयत्न देखील केला. शेवटी आइसक्रिम घेऊन खाऊ लागला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मजेदार व्हिडिओ पहा.



व्हायरल झालेल्या व्हिडीओने अनेकांचे मनोरंजन केले आहे. इतकेच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये हसणारे इमोजी पोस्ट करून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ 2.5 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.