अनैतिक संबंधातून टयुटरने केली ८ वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या...
अपहरण, हत्या, लहान मुलांवरील अत्याचार या प्रकरणात सातत्याने वाढ होत असताना पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
भोपाळ : अपहरण, हत्या, लहान मुलांवरील अत्याचार या प्रकरणात सातत्याने वाढ होत असताना पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे हे प्रकरण?
दुसरीत शिकणाऱ्या एका ८ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्या प्रकरणी १९ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ वर्षांच्या लहान मुलाला शिकवण्यासाठी १९ वर्षीय ट्यूटर घरी येत असे. त्याचदरम्यान त्याचे आणि त्या मुलाच्या आईचे (३० वर्षीय महिलेचे) अनैतिक संबंध जुळले.
बैरागढ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुधीर अरजरिया यांनी सांगितले की, राजेंद्र नगर येथे राहणाऱ्या भरत उर्फ कार्तिक महावर (८) याच्या हत्येच्या आरोपात त्याचीच ट्यूशन घेणाऱ्या विशाल रूपाणी या तरूणाला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी घटनेच्या सहा तासांनंतर लगेचच त्याला अटक केली. त्याच्या विरोधात कलम ३०२, ३६४ आणि २०१ याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अपहरण आणि मग हत्या
त्याचबरोबर पोलीसांनी सांगितले की, विशाल सुमारे ६ महिन्यांपासून मुलाच्या घरी जावून मुलाची ट्यूशन घेत होता. त्याचदरम्यान त्याचे आणि मुलाच्या आईचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले. विशालने सोमवारी दुपारी भरतच्या शाळेतून त्याचे अपहरण केले आणि गळा आवळून त्याची हत्या केली.
असा केला गुन्ह कबुल
त्यानंतर आरोपीने मुलाचा मृतदेह एका गोणीत भरून मुबारकपूर टोल टॅक्स नाक्यावरील रस्त्यावर फेकून दिला. मुलगा शाळेतून घरी न आल्याने विशालकडे संशय व्यक्त करण्यात आला. पोलीसांनी आरोपीला घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबुल केला.