नवी दिल्ली : ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) Jack Dorsey यांच्याबाबत एक आश्चर्यचकित करणारी बाब समोर आली आहे. जॅक यांनी त्यांच्या डाएट प्लानचा खुलासा केला आहे. त्यांच्या डाएट प्लानने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. जॅक यांनी, ते सात दिवसांत केवळ सात वेळाच खात असल्याचं सांगितलंय. संपूर्ण आठवडाभर ते केवळ रात्रीच जेवतात. रात्रीच्या जेवणाव्यतिरिक्त ते दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता यापैकी काहीच करत नसल्याचं सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी, यूट्यूबला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली. मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी, ते दररोज ध्यान करत असल्याचंही सांगितलं. ते दरदिवशी २२ तास उपवास करतात. जॅक, त्यांचा डाएट प्लान अतिशय कडक फॉलो करत असल्याचंही ते म्हणाले.


त्याशिवाय जॅक, फ्रेश राहण्यासाठी रोज आईस बाथही घेतात. आईस बाथ घेणं हा त्यांच्या आगळ्या-वेगळ्या जीवनशैलीचा एक भागच झाल्याचं ते म्हणतात. मुलाखतीदरम्यान जॅक यांनी एका विशेष गोष्टीकडे अधिक जोर देत, ते रोज ऑफिसलाही पायी चालत जात असल्याचं सांगितलं. त्यांनी इतरांनाही जितकं पायी चालता येईल तितकं पायी चालण्याचं आवाहन केलं आहे. 


Jack Dorsey यांनी मेडिटेशन आणि आईस बाथमुळे त्यांना स्वत:ला दररोज फ्रेश, छान वाटत असल्याचंही ते म्हणाले.