भारताचा चुकीचा नकाशा ट्विटरने हटविला
ट्विटरकडून पुन्हा घोडचूक
मुंबई : ट्विटरने आपल्या वेबसाईटवरून जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळ दाखवल्यानंतर भरताचा चुकीचा नकाशा हटविला आहे. ‘Tweep Life’वर दाखवलेल्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळ दाखवल्यानंतर ट्विटरविरूद्ध सक्त कारावई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. पण आता ट्विटरने चुकीचा नकाशा हटविला असल्याचं कळत आहे. भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लेह हा चीनचा भाग दाखवला होता.
आधीच ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू असताना हे प्रकरण समोर आलं आहे. केंद्र सरकारकडून लवकरच ट्विटरला नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्या प्रकरणी ट्विटरवर सक्त कारवाई देखील होवू शकते. मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरला दंड आकारण्यात येवू शकतो. या व्यतिरिक्त, त्या अधिकाऱ्यांना सात वर्ष तुरुंगवास ठोठावला जाऊ शकतो.
यापूर्वी ट्विटरने कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट ब्लॉक केलं होतं. सरकारने म्हटले होते की ही बाब देशाच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेशी निगडित आहे. जम्मू-काश्मीर आणि लेहला चीनचा भाग म्हणून दाखवल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिला होता.