Viral Girls Fighting for Boyfriend Video:  सध्याचा जमाना आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा. सोशल मीडियावर इतक्या गणित गोष्टी व्हायरल होतात की त्या पाहून आपलाही बराच टाईमपास होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात क्लासरूममधील दोन मुली या एकमेकींशी जोरात भांडताना दिसत आहेत. त्यामुळे त्या दोघींची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांच्या या व्हिडीओवरून नेटकरीही त्यांची जोरात खिल्ली उडवताना दिसत आहेत. नेटकरीही यावर सुसाट कमेंट करताना दिसत आहेत. सध्या कॉलेजमधल्या काही मुलींचा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. या मुली कॉलेजमध्ये शिकत आहेत. त्यांच्यातील वादाचा नक्की विषय काय हे ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या बॉयफ्रेंडसोबत आपली सखी दिसली जरी दुसऱ्या मैत्रिणीला होणारा झळफळाट काही केल्या लपत नाही. तो उफाळून बाहेर येतो. अनेकदा सोशल मीडियावरून अश्या काही तिरसटलेल्या मुलींचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. बॉयफ्रेंडवरून त्या दोघींमध्ये एवढी जुंपते की काही विचारू नका. अगदी एकमेकींच्या झिंज्या उपटेपर्यंत ही मजल जाते. सध्याही या व्हिडीओतून असंच काहीसं समोर आलं आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे.


संपुर्ण वर्ग भरलेला असताना यावेळी पांढऱ्या टीशर्टमध्ये दिसणाऱ्या एका मुलीत काहीतरी संचारले आणि चक्क तिनं दुसऱ्या मुलीला जोरात मारायला सुरूवात केली. तिचे केसही ओढायला तिनं सुरूवात केली होती. तिचा हा रूद्र अवतार पाहून भलेभले गार पडले. त्या दोघींचे भांडणं सोडवण्यासाठी शिक्षिकाही मध्ये आल्या होत्या. 


हेही वाचा : शाहरूखसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत? कधी आमिरची आई, तर कधी करीनाची बहीण



सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओवरून जोरात चर्चा रंगली आहे. या व्हिडीओत जिला ही मुलगी मारते आहे ती जिवाच्या आकांतानं पळताना दिसते परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. ती तिला मारतच सुटते. हा व्हिडीओ बनारसच्या एका कॉलेजचा असल्याचा म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ नाही तर याआधीही असे बरेच व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. किंतु हा विषय जितका हसण्यावारी आपण नेऊ शकतो पण याचेही गांभिर्य हे तितकेच महत्त्वाचे आहे. @gharkekalesh या X युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.