नवी दिल्ली : देशात ऑक्सीजनचा तुटवडा कमी करण्यासाठी आता भारतीय हवाई दलाने कंबर कसली आहे. भारतीय हवाई दल (Indian Air Force) आपल्या विमानांच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात ऑक्सीजन पोहोचवत आहेत. ज्याच्यामुळे लवकरात लवकर ऑक्सीजन पुरवठा होईल. हवाई दलाचे C-17 आणि IL-76 विमानांनी ऑक्सीजन पुरवण्याची सेवा सुरु केला आहे. देशभरात ऑक्सीजन टँकर एअरलिफ्ट केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवाई दलाने म्हटलं की, देशभरात मोठ्या स्टेशनांवरुन मोठे ऑक्सीजन टँकर एअरलिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे आवश्यक ऑक्सीजन वितरण आणखी जलद होईल. ऑपरेशनचा एक भाग म्हणून IAF चे C-17 आणि IL-76 हे विमानं ऑक्सीजन कंटेनर एअरलिफ्ट करत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशभरातील ऑक्सीजन पुरवठ्याबाबतचा आढावा घेतला. बैठकीत पंतप्रधानांनी ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी काय काय करता येईल याची माहिती घेतली.



कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासत आहे. त्यामुळे ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढली आहे. औद्योगिक क्षेत्राला पुरवठा केला जाणार ऑक्सीजन सध्या बंद केला असून फक्त मेडिकल वापरासाठी ऑक्सीजनचा वापर होत आहे.


या शिवाय रेल्वेने देखील ऑक्सीजन पुरवठा केला जात आहे. यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या पाठवण्यात आल्या आहेत.