नवी दिल्ली :  राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजूनही मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी इतरांनी आपली कंबर कसली आहे. यात आज दोन जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, आवश्यक दस्ताऐवज पूर्ण नसल्याने त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. 


एकाचे नाव फेटाळले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देहरादूनचे अजय कथुरिया आणि नवी दिल्ली सुशील कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरले. पण कथुरिया यांचा अर्ज फेटाळण्यात  आला.  कथुरिया ज्या ठिकाणचे मतदार आहेत, तेथील मतदार यादीच त्यांनी कागदपत्रात जोडली नव्हती. 


मुंबईतील दाम्पत्यानेही भरला अर्ज...


अर्ज भरणाऱ्यांमध्ये सायरा बानो आणि मोहम्मद पटेल या दाम्पत्यांचा समावेश आहे. 


१३ जणांनी भरला अर्ज...


या अर्जापैकी बहुतांशी अर्ज फेटाळण्यात येईल,  प्रत्येक अर्जावर ५० प्रस्तावक आणि तितक्याच अनुमोदकांच्या स्वाक्षरी लागतात. आतापर्यंत गेल्या ३ दिवसात १३ उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. त्यातील ६ तात्काळ फेटाळण्यात आले आहेत.