गुजरातमध्ये भाजपला आणखी एक धक्का
गुजरातमध्ये निवडणुकीचं अधिकृत बिगुल अजूनही वाजलेलं नसलं, तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यात टोकाची रस्सीखेच पहायाला मिळतेय.
अहमदाबाद : गुजरातमध्ये निवडणुकीचं अधिकृत बिगुल अजूनही वाजलेलं नसलं, तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यात टोकाची रस्सीखेच पहायाला मिळतेय.
राज्यातल्या पाटीदार समाजाचे दोन नेते भाजप सोडून बाहेर पडले आहेत. कालच पाटीदार समाजाचे आमदार नितीन पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दहा लाख रुपये रोख मिळाल्याचा आरोप केला. तर आज सकाळी निखील सवानी यांनीही भाजपनं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांचं भूमीपूजन करून परतले आहेत. निवडणूकीच्या तोंडावर लोकांनी पक्ष सोडणे हे भाजपसाठी फारसं चांगलं लक्षण नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.