नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलासोबत आज रविवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवासी वस्तीत दोन ते तीन दशहतवादी घुसले होते. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर सुरक्षा दलाने दिला. ही चकमक अद्याप सुरु आहे. दरम्यान, दोन दहशतवाद्याना ठार करण्यात आले आहे.


डीसीपीच्या गाडीतून जाणाऱ्या दहशतवाद्यांना अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाकडूनही गोळीबार करण्यात आला. ही चकमक सुरुच आहे. आणखी दहशतवादी वस्तीत लपल्याची माहिती पुढे येत आहे.  सध्या चकमक सुरू आहे. दरम्यान, दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील त्रालमधील गुलश्नपोरा भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात छावणीचे स्वरुप आले आहे. येथे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.


दुसर्‍या एका घटनेत शोपियानमधील नरबळ ओमपोरा भागात दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागेचा ठावठिकाणा सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला लपण्याच्या ठिकाणावरून अनेक चादरी आणि इतर खाण्यायोग्य वस्तू मिळाल्या आहेत.


शनिवारी सायंकाळी पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यातील देगवार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलिकडून (एलओसी) गोळीबार करण्यात येत होता. रात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी रेंजर्सनी छोटी शस्त्रे आणि तोफगोळे डागण्याबरोबरच गोळीबार करण्यास सुरवात केली. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, त्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.


११ जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरमधील अनपू अनंतनाग येथे हिज्बुल-मुजाहिद्दीनशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये हिज्बुलचा एक प्रमुख कमांडरही आहे.