श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, या भागात एक संयुक्त कारवाई सुरू केली गेली आणि ज्या घरात दहशतवादी लपले होते त्या घराला घेराव घालताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांनावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरात करण्यात आलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झालेत. तर सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला, त्यानंतर या जवानाचे मृत्यू झाला.


जम्मू-काश्मीरचे डीजीपी म्हणाले, "पोलिसांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे स्थानिक सैन्य आणि सीआरपीएफ युनिटने आज सकाळी पुलवामाच्या बंडजू गावात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा दलाने आतापर्यंत दोन अतिरेकी ठार केले आहेत. सीआरपीएफचे एक सैनिक शहीद झाला आहे. कारवाई अजूनही सुरु आहे. परिसराला घेराव घालण्यात आला आहे. "