Kerala Woman News : केरळमध्ये (Kerala) मंगळवारी 11 ऑक्टोबर 2022 रोजी पोलिसांनी काळ्या जादू प्रकरणी दोन महिलांचा नरबळी (Human Sacrifies) देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आणली. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या महिलांची हत्या करुन त्यानंतर त्यांचे मृतदेह पुरण्यात आले होते. नातेवाईकांच्या माहितीनुसार या दोन्ही महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळं त्यांनी पोलिसांत सदरील प्रकरणी तक्रार दाखल केली होती. (two women lost life for human sacrifice in kerala amid financial prosperity reason)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती हाती येताच पोलिसांनी एर्नाकुलम (Ernakulam) जिल्ह्यातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या रोसेलिन आणि पद्मा यांची एका दाम्पत्यानं हत्या केल्यची हादरवणारी माहिती समोर आली. आर्थिक अडचणींना दूर करण्यासाठी या दाम्पत्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं की ऐकूनच थरकाप उडतोय. सध्या पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दाम्पत्यासह आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.


शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी लपवले मृतदेह


रोसेलिन आणि पद्मा या दोघींनीही एर्नाकुलम येथे लॉटरीची तिकिटं विकण्याचं काम सुरु केलं होतं. रोसेलिन जून महिन्यापासून तर, पद्मा सप्टेंबर महिन्यापासून बेपत्ता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतिशय निघृणपणे त्यांची हत्या करत, पठानमथिट्ठा जिल्ह्यातील थिरुवल्लामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह पुरले.


भगवंत सिंह आणि लैला अशी या आरोपी दाम्पत्याची नावं आहेत. या हत्यांनी त्यांना समृद्ध आणि सुखी जीवन प्राप्त होईल अशी समजूत होती, ज्यामुळं त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जात हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान सदर प्रकरणी या दाम्पत्याला रशित उर्फ मोहम्मद शफी नावाच्या इसमानं मदत करत यासाठी त्यांची मनधरणी केल्याचंही कळत आहे. महिलांचं अपहरण करुन त्यांना या दाम्पत्याच्या घरी याच इसमानं आणल्याचा संशय सध्या बळावला आहे.


अधिक वाचा : Shocking! ‘पृथ्वीवर परतून लग्न करतो’, सांगणाऱ्या Fake Astronaut नं महिलेला दाखवलं नरक


पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर दाम्पत्याकडून त्याच्याच घरात जून महिन्यात नरबळी दिल्याचं कबुल केलं. सदर प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीनं नरबळी देणं कसं फायद्याचं ठरेल याबाबतचा विश्वास या जोडप्याच्या मनात निर्माण केला होता.


सध्याच्या घडीला पोलिसांना मृत महिलांच्या शरीराचे एकाहून अधिक अवशेष सापडले आहेत. ज्यामुळं अंधश्रद्धेपोटीच हे क्रूर काम केल्याचं सांगत सदरील तपास सुरु असल्याचं यंत्रणांनी स्पष्ट केलं.