2020 पर्यंत उबर इंडिया देणार १० लाख लोकांना नोकरी !
काळ्या पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल ओला, उबर यांच्या टॅक्सी सुविधेला प्रवासी अधिक प्राधान्य देतात.
नवी दिल्ली : काळ्या पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल ओला, उबर यांच्या टॅक्सी सुविधेला प्रवासी अधिक प्राधान्य देतात.
2013 मध्ये बंगळूरूमधून भारतात उबर टॅक्सी सेवेला सुरुवात झाली. सद्ध्या भारतात 29 शहरात सेवा देणारी उबर कंपनी येत्या 3 वर्षामध्ये सुमारे 10 लाख लोकांना नोकरी देणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
उबर कंपनी ही मूळची अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील कॅब एग्रीगेटरची कंपनी आहे. चार वर्षांपूर्वी उबर इंडियाने बंगळुरूमधून केवळ ३ कर्मचाऱ्यांना घेऊन कॅब सेवा सुरू केली होती. आज आमच्याकडे १ हजारहून अधिक लोक काम करत आहे. भारतात सध्या साडे चार लाख नोंदणीकृत वाहनचालक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीच्या टेक टीमने बंगळुरू आणि हैदराबाद येथून १०० इंजिनिअर नियुक्त केले आहेत. हैदराबादमध्ये एक कस्टमर सपोर्ट सेंटर उघडले असून यात ४०० कर्मचारी काम करीत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
राइड- शेअरिंग प्रॉडक्ट 'उबरपूल' हा प्रयोग भारतात यशस्वी ठरला आहे. यामुळे वायू प्रदूषण कमी होत आहे, असा कंपनीचा दावा आहे. सप्टेंबर २०१५ साली बंगळुरूमध्ये उबरपूल या संकल्पनेची सुरुवात झाली. हळूहळू आता दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि पुण्यातही उबरपूल सुविधा प्रवाश्यांना उपलब्ध करण्यात आल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.