उबर बलात्कार प्रकरण : महिलेने मागे घेतली तक्रार...
तीन वर्षांपुर्वी उबर टॅक्सीमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता.
नवी दिल्ली : तीन वर्षांपुर्वी उबर टॅक्सीमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. मात्र हे प्रकरण पीडित महिला आणि कंपनी यांमध्ये सामंजस्याने मिटवण्य़ात आले आहे. एका भारतीय महिलेवर करण्यात आलेल्या या अत्याचारचा खटला अमेरिकेच्या कोर्टात चालत होता.
काय आहे हे प्रकरण ?
कंपनीच्या चालकाने महिेलेवर बलात्कार केला होता. हे प्रकरण समजूतीने मिटवण्यात येईल आणि या खटल्यावर जानेवारीत पडदा पडेल, असे कंपनीने सांगितले. परंतु, कोणत्या अटींवर हे प्रकरण मिटवण्यात आले आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
या महिलेवर २०१४ मध्ये दिल्लीत बलात्कार झाला होता. महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली आणि स्वच्छेने मागे घेतली. यावर्षी जूनमध्ये महिलेने कंपनी आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्राविस कलानिक यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती.