820 कोटींचा नवा घोटाळा! बँकेने नाही ग्राहाकांनीच अचानक आलेला पैसा उडवला; CBI चा मोठा खुलासा
Bank News : CBI नं तपास हाती घेत नेमके हे पैसे कोणी पाठवले यावरून पडदा उचलला आणि मोठं बिंग फुटलं. खातेधारकांच्या खात्यात रक्कम आली आणि त्यांनी खर्चही केली. आता पुढे काय?
Bank News : बँकेच्या व्यवहारामध्ये एक लहानशी चूकसुद्धा आपल्याला बऱ्याचदा काही अडचणींपुढे नेऊन उभी करते. पण, बँकेकडूनच गोंधळ झाला असे तर? देशभरात सध्या अशाच एका बँकेनं अनेकांनाच धक्का दिला आहे. कारण, या बँकेच्या खातेधारकांच्या खात्यात अचानकच 820 कोटी रुपये आल्यानं एकच खळबळ माजली आहे. हा घोटाळा आहे की फसवेगिरी? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. ही एखाद्या चित्रपटाचीच स्क्रीप्ट वाटतेय ना? पण, हे प्रत्यक्षात घडलं असून, आता त्यापुढची माहिती तर धक्कादायक आहे.
CBI नं या प्रकरणी तपास सुरु केला असता प्राथमिक स्तरावर यासंदर्भातील तक्रार दाखल करत पुढील तपास हाती घेतला आहे. यातून समोर आलेल्या माहितीनुसार 10 ते 13 नोव्हेंबरदरम्यान, युको बँक (UCO Bank) मधील जवळपास 41000 खातेधाकांच्या नावे त्यांच्या खात्यांमध्ये एकाएकी 820 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. एकिकडे या खात्यांमध्ये इतकी मोठी रक्कम जमा झालेली असतानाच दुसरीकडे त्यांच्या खात्यातून कोणतीही Debit Activity झाली नसल्याचं समजलं. मग हे पैसे आले कुठून? हाच प्रश्न अनेक तर्कवितर्कांना चालना देऊन गेला.
हेसुद्धा वाचा : 'महोदय आता काय करणार?' संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल
सीबीआय तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या मोठ्या घोटाळ्याची सूत्र दोन इंजिनिअरनी हलवल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या दोघांनी खासगी बँकांमधील 14 हजार खात्यांमधून पैसे काढून ते युको बँकेच्या 41 हजार खातेधारकांच्या खात्यांमध्ये पाठवले. या प्रक्रियेमध्ये 8.53 लाख IMPS ट्रान्सफर होताच बँकेच्याही ही बाब लक्षात आली आणि बँकेनं IMPS सेवा बंद केली. या प्रकरणाची एकंदर पाळंमुळं पाहता मंगळवारी सीबीआयनं गुन्हा दाखल केला.
अनेक खातेधारकांनी घेतला या पैशांचा फायदा...
युको बँकेत घडलेल्या प्रकाराबद्दल सीबीआयनं तपास हाती घेत मंगळुरू आणि कोलकात्यासह इतर 13 शहरांमध्ये धाडसत्र सुरु केली आणि त्यातून नवी माहिती उघड झाली. खात्यात एकाएकी इतकी रक्कम येताच खातेधारकांचा गोंधळ उडाला. तर, काही खातेधारकांनी ही रक्कम Withdraw करत त्याचा फायदा घेतला. जवळपास 14 हजार खात्यांतून रक्कम काढण्यात आली असली तरीही बँकेकडून ती रक्कम खात्यातून कापण्यात आलेली नाही. दरम्यान तपासातून आतापर्यंत ईमेल अर्काइव आणि डेबिट/क्रेडिट कार्ड, मोबाईल, लॅपटॉप आणि तत्सम पुरावेही जप्त करण्यात आले.
सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये 8,53,049 व्यवहार झाले असून, एका चुकीमुळं हे सर्व व्यवहार युको बँकेच्या रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर काही खातेधारकांनी चुकीच्या पद्धतीनं विविध बँकींग माध्यमातून युको बँकेतून बेकायदेशीररित्या पैसेही काढून घेत या अवेळी आलेल्या लक्ष्मीचा लाभ घेतला आहे. आता या प्रकरणी पुढील माहिती नेमकी कोणत्या टप्प्यावर आणते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.