अयोध्या : अयोध्येत राम मंदिरासाठी येत्या दोन दिवसात जोरदार वादळ उठणार अशी शक्यता आता निर्माण झालीय. विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटना राममंदिराचा मुद्द्यावर अयोध्येत वातावरण तापू लागलंय. उद्या आणि परवा असा दोन दिवसांचा उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आलाय. त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे निघाले आहेत. प्रत्यक्ष अयोध्येतही या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चात आता स्थानिकांमध्येही रंगू लागलीय. अयोध्येतल्या महत्त्वाच्या चौकात उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी फलक झळलेत. फलकांवर उद्धव ठाकरेंचा चेहरा प्रमुख्यानं दिसतोय... पण, चर्चा मात्र अजूनही बाळासाहेब ठाकरेंच्याच नावाचीच आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा आहे... त्याचं कारणही स्पष्ट आहे ते म्हणजे 'बाल ठाकरे का लडका आ रहा है' हे आता अयोध्यावासियांपर्यंतही पोहचलंय. 


या निमित्तानं 'झी २४ तास'नं अयोध्यावासीयांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी, 'गेली अनेक वर्ष रामलला तंबूत आहे, त्याला मुक्त करा' अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय.