जम्मू-काश्मीर : उधमपूर जिल्हात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण मृत्यूमुखी  पडले असून 31 जण गंभीर जखमी आहेत. उधमपूर जिल्ह्याकडून श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बस सरकल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार अपघात शनिवारी मध्यरात्री सुरिनसर जवळील चंदेह गावात झाला. बस चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस एका खड्ड्यात कोसळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरील निर्बंधांमुळे वाहतूक पोलिसांना टाळण्यासाठी वाहन चालकाने बस दुसऱ्या दिशेने वळवली. शनिवारी जम्मू येथून श्रीनगरला जाण्यासाठी जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग मोकळा करून देण्यात आला होता. पाऊस आणि हिमवर्षाव झाल्यानंतर भूस्खलन झाल्यामुळे हा मार्ग बर्याच दिवस बंद होता. अपघाता नंतर तात्काळ घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले.


याबाबत माहिती देताना एका अधिकार्याने सांगितले की, बचावकार्या दरम्यान पाच लोक मरण पावले तर 32 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारांसाठी जम्मूच्या सरकारी मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.