नवी दिल्ली : बँक खात्यापासून ते अगदी पासपोर्ट बनवण्यापर्यंत आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे. पण आधार कार्डमध्ये नाव, जन्म तारीख चुकीची झाली तर ती मोठी समस्या ठरु शकते. त्यामुळेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (UIDAI) जन्म तारीख, नावात बदल करण्यासाठी काही अटी निश्चित केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, मोबाईल नंबर, फोटो, ईमेल आयडी, लिंग आणि इतर बदलांसाठी कागदपत्रांची गरज भासणार नसल्याचेही UIDAIकडून सांगण्यात आले आहे. 


ही आहे सुधारित अट


UIDAIने आधारमध्ये जन्म तारीख अपडेट करण्यासाठी काही अटी सांगितल्या आहेत. त्यानुसार, आधारकार्डवर नमूद असलेली तारीख आणि प्रत्यक्षात असलेल्या जन्म तारखेमध्ये तीन वर्षांचा फरक असेल तर, तुम्ही संबंधित कागदपत्रांसह कोणत्याही आधार सुविधा केंद्रावर जाऊन त्यात बदल करु शकता.


परंतु, जन्मतारखेमध्ये बदल करताना तीन वर्षांहून अधिक अंतर असल्यास काही कागदपत्र आवश्यक असणार आहेत. 


जन्मतारखेमध्ये बदल करण्यासाठी, जन्म प्रमाणपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, लेटर हेडवर ग्रुप-ए ऑफिसरकडून प्रमाणित जन्म तारिख, केंद्र सरकारची आरोग्य सेवा योजना फोटो कार्ड किंवा माजी सैनिक फोटो आयडी लेटरहेड, १०वी किंवा १२वी सर्टिफिकेट, फोटो आयडी अशी कागदपत्र आवश्यक आहेत.


चुकीचे नाव छापले गेल्यास -


आधारकार्डवर नाव चुकीचे छापले जाऊन ते अपडेट करायचे असल्यास, त्यासाठीही काही अटी आहेत. UIDAI च्या नव्या निर्णयानुसार, नावात अपडेट करण्यासाठी आता केवळ दोनच संधी मिळणार आहेत. त्यानंतरही नावात चूक आढळल्यास त्याला अवैध ठरवून, नवीन आधारसाठी अर्ज करावा लागणार आहे.



नावात अपडेट करण्यासाठी


पॅनकार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता आहे. या कागदपत्रांसह आधार केंद्रावर जाऊन नावात अपडेट करता येऊ शकते.



अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे अनेकदा आधार इतर कागदपत्रे, अकाउंटशीही लिंक करण्यास सांगण्यात आले आहे. पेन्शनधारी लोकांसाठीही आधार गरजेचे आहे. पेन्शनसाठी आधार लिंक नसल्यास पेन्शन मिळत नाही. जनधनसारख्या योजनांसाठीही आधार आवश्यक आहे. आधार पॅनशी लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटची तारिख आहे.