मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा कोरोनामुळे Coronavirus मृत्यू झाल्याची चर्चा कालपासून सोशल मीडियावर रंगली आहे. याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदची प्रकृती बिघडल्याची किंवा त्याचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यामुळेच शनिवारी सकाळपासून भारतात ट्विटरवर #Undertaker हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे. अनेक युजर्स #Undertaker पेक्षा दाऊद जास्तवेळा मेला असेल, असे सांगत या दाऊच्या निधनाच्या वृत्ताची खिल्ली उडवतान दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह नाही, भाऊ अनिस इब्राहिमचा खुलासा


तर दुसरीकडे दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचा खुलासा केला आहे. 'आयएनएस' वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दाऊदला कोरोनाची लागण झालेली नाही. तो आपल्या घरीच असल्याचे अनिसचे म्हणणे आहे.

दाऊद हा भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. गेल्या काही वर्षांपासून तो दुबई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते. मात्र, पाकिस्तानने प्रत्येकवेळी याबाबतीत हात झटकले आहेत. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल.