पुणे : गुंड डॉन छोटा राजनची भाची प्रियदर्शिनी निकाळजे हीला पुणे पोलिस गुन्हे शाखेने वनोवरी येथून खंडणी प्रकरणात अटक केली आहे. यापूर्वी शनिवारी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कुख्यात गुंड छोटा राजनची भाची प्रियदर्शिनी निकाळजे यांच्यासह खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडणी प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसर्‍या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. छोटा राजन आणि त्याच्या साथीदारांवर 22 जानेवारी रोजी सेंन्ट्रल इन्वेस्टीगेशन ब्युरो (सीबीआय) ने खून, खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली चार नवीन गुन्हे दाखल केले आहेत.


2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून छोटा राजनला अटक झाल्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला दिल्लीच्या तिहार तुरूंगात ठेवले आहे. अलीकडेच कोरोनामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची बातमी समोर आली होती, जी नंतर फसवी ठरली. छोटा राजन सध्या कोरोनामुळे संक्रमित आहे. त्याला दोन आठवड्यांकरता उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले आहे.


गुंड छोटा राजनवर अपहरण, खून अशी 70 हून अधिक गंभीर प्रकरणे आहेत. 2011 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणात, त्याला 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली होती.


काही दिवसांपूर्वी मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने 1993 च्या मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हनीफ लकडावालाच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याचा साथीदारची निर्दोष सुटका केली होती.