मुंबई : कोरोनाच्या काळात नोकऱ्या गमावलेल्या लोकांना मोदी सरकार बेरोजगारी भत्ता देत आहे. सरकारने ही योजना कोरोना काळातच सुरू केली होती, मात्र त्याची मुदत आता सरकारकडून वाढवण्यात आली आहे. मात्र सरकारने ती योजना आता जूनपर्यंत वाढवली आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ESIC च्या देखरेखीखाली अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना (ABVKY) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, सरकार अशा लोकांना बेरोजगारी भत्ता देत आहे ज्यांनी कोरोना महामारीमध्ये आपली नोकरी गमावली आहे. एका अंदाजानुसार या योजनेत 40 लाख लोकांना नोकऱ्या देखील मिळणार आहेत. परंतु याबाबात सरकारने काहीही वक्तव्य केलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना ESIC कडून विमाधारक कर्मचार्‍यांना त्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोख भरपाईच्या रूपात दिलासा मिळतो. सध्या या योजनेअंतर्गत, विमा उतरवलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या सरासरी कमाईच्या 50 टक्के रक्कम जास्तीत जास्त 90 दिवसांसाठी दिली जाते जेव्हा तो बेरोजगार होतो.


सरकारने दिलेल्या या पेमेंटचा अर्थ असा आहे की, जर एखादी व्यक्ती दरमहा 30 हजार कमावते, तर त्याच्या 90 हजारच्या 50% म्हणजेच सुमारे 2 वर्षात 45 हजार रुपये दिले जातील. मात्र, मोदी सरकारच्या अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.


या योजनेचा लाभ फक्त त्या व्यक्तींनाच मिळेल जे असंघटित क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांचे पैसे पीएफ किंवा ईएसआयसीमध्ये कापले गेले आहेत. कोरोनाच्या काळात अशा लोकांची नोकरी गेली तर केंद्र सरकार त्यांना अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेअंतर्गत आर्थिक मदत करेल.


योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही


या योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्ती बेरोजगार झाल्यास आणि नवीन रोजगार शोधत असताना रोख मदत रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. तसेच या योजनेचा लाभ कोणत्या व्यक्तीला मिळणार नाही, हेही जाणून घेतले पाहिजे.


चुकीच्या आचरणामुळे किंवा चुकीच्या कामामुळे एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली, गुन्हा दाखल केल्यानंतर, कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकले, तर अशा व्यक्तीला अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगारी भत्ता मिळणार नाही. ज्यांनी स्वेच्छेने नोकरी सोडली आहे, म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती सेवा किंवा VRS घेतली आहे, त्यांना या योजनेत समाविष्ट केले जाणार नाही.


योजनेचा लाभ कसा घ्यावा


सर्वप्रथम तुम्हाला ESIC च्या www.esic.nic.in या वेबसाइटवर जावे लागेल


बेरोजगारी भत्ता मिळविण्यासाठी फॉर्म डाउनलोड करा आणि तो रीतसर भरा


फॉर्म भरल्यानंतर तो ESIC च्या जवळच्या शाखेत सबमिट करा


नोटरी प्रतिज्ञापत्र फॉर्मसोबत जोडावे लागेल ज्यामध्ये 20 रुपयांचा स्टॅम्प पेपर जोडावा लागेल.


फॉर्ममध्ये AB-1 ते AB-4 एकत्र जमा करावे लागतील.


सरकारने दिलेली माहिती


केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी बुधवारी संसदेत अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेची माहिती दिली. तेली म्हणाले की, या योजनेंतर्गत 82 हजार 724 दावे प्राप्त झाले होते, त्यापैकी 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत 61 हजार 314 दावे निकाली काढण्यात आले आहेत. म्हणजेच अशा असंख्य लोकांना सरकारने बेरोजगारी भत्ता दिला आहे.