लग्नात गेले `बिन बुलाए मेहमान`, फुकट जेवणाच्या नादात पोहोचले तुरुंगात
Trending News In Marathi: आमंत्रण नसताना लग्न समारंभात घुसणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
Trending News In Marathi: अमीर खानच्या थ्री इडियट चित्रपटातील एक दृष्य तेव्हा चांगलाच गाजले होते. एका लग्नसोहळ्यात आमंत्रण नसताना तिन्ही अभिनेते घुसतात आणि नंतर उडालेला त्यांचा गोंधळ हा सीन अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडला आहे. इथे एका लग्नात दोन मित्र घुसले. लग्नात जेवण देखील केले डान्स केला. मात्र, त्याचवेळी असं काही घडलं की दोघांनाही जेलची हवा खावी लागली.
लखनौच्या सरोजनी नगर येथील ही घटना आहे. इथे एका मोठ्या मैदानात पार्टी सुरू होती. घरातील सदस्य आणि पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी तिथे दोन युवक पोहोचले. सगळ्यात आधी त्यांनी भरपेट जेवण केले त्यानंतर डीजेवर डान्स केला. इथपर्यंत तर सगळे ठिक होते. मात्र, त्यानंतर डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक त्यातील एका युवताने अवैध शस्त्र काढले आणि हवेत भिरकवण्यास सुरुवात केली.
तरुणाचे हे कृत्य पाहून वधुपक्षाला संशय आला. त्यांनी तरुणाची विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघेही तरुण आम्ही पाहुणे असल्याचीच बतावणी करुन लागले. त्यानंतर वरपक्षातील लोकही आले. त्यांनी चौकशी करताच दोन्ही युवकांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर वधुपक्षाने तातडीने पोलिसांनी फोन केला. लग्न समारंभात अवैध शस्त्र घेऊन आल्याप्रकरणी दोन्ही युवकांना अटक करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांचे नाव राकेश यादव आणि धीरे यादव असं आहे. ते दोघेही लग्नात आमंत्रण नसताना आले होते.
या प्रकरणी डीसीपी सेंट्रल झोन अपर्णा कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमंत्रण नसताना दोन युवक लग्न समारंभात घुसले होते. जेवण झाल्यानंतर दोघही डीजेच्या तालावर अवैध शस्त्रासह डान्स करत होते. त्यानंतर लॉनच्या मॅनेजरने पोलिसांना याबाबत माहिती दिली. युवकांची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याजवळ बेकायदेशीर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.