नवी दिल्ली : घरबसल्या पैसे कमवावे असे प्रत्येकाला वाटते. तुम्हाला देखील असे वाटत असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यूनियन बैंक ऑफ इंडिया (union bank of india) आपला बिजनेस वाढवण्यासाठी देशात आली १२४१ एटीएम सुरु करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी टेंडर देखील सुरु करण्यात आले आहे. तुमच्याकडे देखील जागा उपलब्ध असेल तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे संपर्क करा :
तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर युनियन बँकेच्या तुमच्या जवळच्या शाखेतील ब्रांच मॅनेजरशी संपर्क साधा. 


इतक्या जागेची गरज :
एका एटीएमसाठी १०x१० फूट जागेची गरज आहे. जर तुमच्याकडे इतकी जागा असेल तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता. काही बँका यापेक्षा कमी जागेत एटीएम सुरु करतात. 


फायदा :
तुम्हाला किती भाडे मिळेल याचा निर्णय जागेचे लोकेशन लक्षात घेऊन बँक ठरवेल. मेट्रो सिटीमध्ये भाडे अधिक मिळेल. तर छोट्या शहरात भाडे कमी असेल. 


प्रक्रिया : 
जर तुम्हाला देखील ही संधी खुणावत असेल तर प्रथम बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमच्या जागेसंबंधित माहिती द्या. म्हणजे तुमची जागा कोठे आणि किती आहे. आणि त्याजागी बँक एटीएम चालू करण्यास उत्सुक असल्यास तुम्ही आवेदन करू शकता.