नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


होमलोनच्या टॅक्समध्येही सूट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासोबतच एसबीआयने होमलोनवर टॅक्सची सूट मिळण्याची मर्यादा सध्या २ लाख रूपये आहे. ही सध्याची मर्यादा वाढवून २.३० लाख रूपये करण्याचीही सूचना केली आहे. बॅंकेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर होमलोनवर दिल्या जाणा-या व्याजात सूट मिळण्याची मर्यादा २ लाखांवरून वाढवून २.५ लाख रूपये केली गेली तर यामुळे ७५ लाख घरे खरेदीदारांना सरळ फायदा होईल. 


७५ लाख लोकांना लाभ


एसबीआय म्हणाली की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर लोकांच्या खर्च करण्यायोग्य उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्सची मर्यादा ५० हजार रूपयांनी वाढवून ३ लाख रूपये करण्याची गरज आहे. बॅंकेचं म्हणनं आहे की, यामुळे साधारण ७५ लाख लोकांना लाभ मिळणार आहे.


बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी


बजेट २०१८ साठी जाहीर करण्यात आलेल्या या रिपोर्टमध्ये बॅंक बचतीच्या माध्यमातून बचतीला प्रोत्साहन देण्याची सूचनाही केली आहे. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार बॅंक बचत जमा रकमेच्या व्याजात सूट देऊ शकते. सोबतच टॅक्स सेव्हिंग्स फिक्स्ड डिपॉझिटचा कालावधी पाच वर्षांहून घटवून तीन वर्ष करण्याची गरज आहे.