Union Budget 2023 : मेक इन इंडिया आणि AI ची संकल्पना साकार करण्यासाठी, तसेच उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (Artificial intelligence) 3 उत्कृष्टतेची केंद्रे स्थापन केली जातील. कौशल्य विकासावर भर देणार असल्याचं सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितलंय. त्यामुळे यंदा कौशल्यपूर्ण असलेल्या युवकांना रोजगाराची संधी (Employment opportunity) मिळेल, असं अर्थमंत्र्यांनी बजेट (Union Budget 2023) सादर करताना म्हटलं आहे. (Union Budget 2023 big announcement of the Finance Minister Nirmala Sitharaman regarding employment in india )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0  पुढच्या तीन वर्षांत लाँच केली जाईल. नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल. त्यासाठी विविध राज्यांमध्ये ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येईल.ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंग सारख्या नवीन युगातील अभ्यासक्रमांचाही समावेश असेल.  युनिफाइड स्किल इंडिया प्लॅटफॉर्म लाँच करण्यात येणार आहे.


आणखी वाचा - Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा


तरुणांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी कौशल्य देण्यासाठी, विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल केंद्रे स्थापन केली जातील. पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. भांडवली गुंतवणुकीत 33 टक्क्यांची वाढ देखील करण्यात आली आहे. 10 लाख कोटींपर्यंत वाढ केल्याने यंदा रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. गुंतवणूकीची ही रक्कम एकूण जीडीपीच्या 3.3 टक्के आहे. त्यामुळे त्याचा फायदा युवकांना होणार आहे.


दरम्यान, स्टार्टअपसाठी धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. रेल्वेच्या नव्या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत, त्यामुळे रेल्वेमध्ये देखील अनेक रोजगाराच्या संधी मिळतील