IT Slab Budget 2023 :  देशाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023 ) टॅक्स संदर्भता मोठी घोषणा करण्यात आली आहे. 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा मोदी करकारने केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finanace Minister nirmala sitharaman ) यांनी वैयक्तिक कर संदर्भात 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी कर सवलत 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ही सूट नवीन आणि जुन्या अशा दोन्ही कर व्यवस्थांना लागू असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्यांच्या इन्कम टॅक्ससंदर्भात मोठी घोषणा बजेटमध्ये करण्यात आलीय. सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.  नव्या कररचनेनुसार हे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. मध्यमवर्गीयांसाठी इन्कमटॅक्समध्ये मोठी सूट मिळाली आहे. 


9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45,000 रुपये कर आकारला जाईल. 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांकडून कोणताही कर आकारला जाणार नाही. 3 ते 6 लाखांच्या उत्पन्नवार 5 टक्के कर आकारला जाणार आहे. 6 ते 9 लाखाच्या उत्पन्नावर 10 टक्के कर, 9 ते 12 लाख उत्पन्नावर 15 टक्के कर, 12 ते 15 लाखावर 20 टक्के कर तर 15लाखांहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर लावला जाणार आहे. 


यापूर्वी, 2020-21 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन सवलतीच्या आयकर प्रणालीची घोषणा केली होती, ज्यामध्ये कमी कर दर लागू करण्यात आले होते. नवीन प्रणाली अंतर्गत, 0-2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण आयकर सूट देण्यात आली आहे. 


2.50-5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कराची तरतूद होती. 5 ते 7.50 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना आता 10 टक्के कर भरावा लागणार आहे, तर 7.50 ते 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना आता 15 टक्के कर भरावा लागणार आहे. 10 ते 12.50 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर भरावा लागेल. 12.50 ते 15 लाख रुपये कमावणाऱ्यांना 25 टक्के कर भरावा लागेल. दुसरीकडे, ज्यांचे उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना 30 टक्के कर भरावा लागेल. 


जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये, 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता, यामध्ये, आयकर कायद्याच्या कलम 80 नुसार, 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर देखील करामध्ये सूट देण्यात आली.  या टॅक्स स्लॅबमध्ये करदात्याला 6.50 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जुन्या टॅक्स स्लॅबनुसार 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जात होता.