Union Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
Union Budget 2023 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात येतात. तसेच यावेळी त्या 5-10 लाखांत वेगळा टॅक्स स्लॅब जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच करात सुट देण्याचा स्लॅबदेखील वाढविण्याची शक्यता आहेत. पण यामध्ये Intersting गोष्ट म्हणजे सुरूवातीला विवाहित असो किंवा अविवाहित दोघांनाही वेगवेगळा टॅक्स भरावा लागत होता. मात्र या नियमात बदल झाला असून आजच्या घडीला विवाहित असो किंवा अविवाहित दोघांनाही एकसारखाच टॅक्स भरावा लागतो.
वाचा: अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
स्वातंत्र्यानंतर बजेटमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आले होते. आता बजेट स्कीम हिंदीतूनही छापले जाते, परंतू त्याची सुरुवात पाच सहा दशकांपूर्वी झाली होती. याचवेळी एक वेगळा प्रयोग झाला होता. तो म्हणजे 1955-56 च्या केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे तत्कालीन अर्थमंत्री सी.डी.देशमुख (CD Deshmukh) यांनी सादर केला होता. त्यांनी बजेटमध्ये विवाहित आणि अविवाहितांसाठी स्वतंत्र आयकर स्लॅब केले होते. कुटुंब योजना सुरू करण्यासाठी सरकारने टॅक्स स्लॅबची तरतूद आणली होती.
अर्थमंत्री सीडी देशमुख (CD Deshmukh) यांनी सध्याच्या करमुक्त स्लॅबमध्ये विवाहितांसाठी 1,500 ते 2,000 रुपयांची वाढ केली होती, तर अविवाहितांसाठी ती 1,000 रुपयांपर्यंत कमी केली होती. नियोजन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे विवाहित आणि अविवाहितांसाठी स्वतंत्र कर स्लॅब तयार करण्यात आले होते. यासोबतच अर्थसंकल्पात आयकरावरील कमाल दर पाच आण्यांवरून चार आण्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. 1955-56 च्या अर्थसंकल्पात सुरूवातीला अर्थसंकल्प योजनेची हिंदी आवृत्तीही सादर करण्यात आली. तेव्हापासून वार्षिक आर्थिक स्टेटमेंट आणि स्पष्टीकरणात्मक मेमोरँडमची फक्त हिंदी आवृत्ती प्रसारित केली जाते.
काय होती रचना...
आर्थिक वर्ष 1955-1956 साठी विवाहित व्यक्तींसाठी आयकर स्लॅब (प्रति रुपया) 1. टॅक्स स्लॅब रु 0 ते रु. 2,000 - देय: कोणताही आयकर देय नाही 2. रु. 2,001 ते रु. 5,000 टॅक्स स्लॅब - देय आयकर दर: रु. मध्ये नऊ पैसे. 3. रु. 5,001 ते रु. 7,500 टॅक्स स्लॅब - देय आयकर दर: एक आना आणि नऊ पैसे ते एक रुपया 4. रु. 7,501 ते रु. 10,000 चा कर स्लॅब - देय आयकर दर: एका रुपयात दोन आणे आणि तीन पैसे 5. रु. 10,001 ते रु. 15,000 टॅक्स स्लॅब - देय आयकर दर: एका रुपयात तीन आणे आणि तीन पैसे अशी रचना होती.
union budget 2023,budget 2023,budget session 2023,budget 2023 expectations,union budget 2023 expectations,union budget 2023 date,union budget,budget 2023 india,national budget 2023,budget 2023 news,budget 2023 live,india budget 2023,union budget 2023-24,2023 budget,expectations from union budget 2023,union budget presentation on february 1 2023,union budget 2022-23,union budget 2023: key expectations,budget 2023 latest news,union budget 2023-2024