Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया
Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.
Union Budget 2023: केंद्र सरकारमार्फत लवकरच येत्या काही दिवसांत युनियन बजेट (Union Budget) सादर केलं जाणार आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष आता येणाऱ्या बजेटवर वेधले आहे. सध्या या बजेटमध्ये काय नवीन घोषणा होतील त्याचबरोबर जुन्या काही घोषणांमध्ये सुधारणा असेल की नसेल यावर सगळ्यांचेच लक्ष आले. सध्या महागाई वाढली असून व्याजदरही (Interest Rate) वाढले आहेत. त्यामुळे लोकांना इएमआयही भरावा लागतो आहे. सध्या मंदीचीही भिती अनेकांना आहे. भारतात या मंदीचे सावट फारसे नसेल असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे सध्या या पार्श्वभुमीवर कोणकोणते बदल होतील याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Union Budget 2023 what were the major decisions government took last budget what you and your family got news in marathi)
मध्यंतरी तीन म्हत्त्वाचे बदल झाले ते म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत चांगले निर्णय घेतले गेले, डिजिटलायझेशनला सुरूवात झाली त्याचबरोबर नव्या योजनांतून पर्सनल फायनान्सला आधार मिळाला.
2022-23 या आर्थिक वर्षातले महत्त्वाचे निर्णय
डिजिटलाझेशन :
डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर दिला, सरकारने डिजिटल विद्यापीठ करण्याची घोषणा केली, 75 डिजिटल बँकिंग युनिट्स उघडण्याची घोषणा केली, 2022-23 मध्ये RBI डिजिटल चलन जारी करण्याची घोषणाही केली, आरोग्य पायाभूत सुविधांसाठी डिजिटल नेटवर्क तयार करण्याची घोषणा केली.
शेअर मार्केट :
LIC चा IPO आणला, एनपीए हाताळण्यासाठी बॅड बँक काम करू लागली.
रोजगार आणि स्टार्टअप्स :
'आत्मनिर्भर भारत'मधून 16 लाख रोजगाराच्या संधी निर्माण केली, मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली, स्टार्टअपसाठी कर सवलत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली, ड्रोन बनवण्यासाठी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली.
इन्फ्रोस्ट्रकचर :
स्पीड पॉवर मास्टर प्लॅनद्वारे इन्फ्राला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली, FY23 मध्ये 25000 KM राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याची घोषणा केली, 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल्स बनवण्याची घोषणा केली, 62 लाख लोकांना पिण्याचे पाणी देण्याची घोषणा केली, 2 लाख अंगणवाड्यांचा आणखी विकास करण्याची घोषणा केली, चिप आधारित पासपोर्ट जारी केले, ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी 1500 कोटी देण्याची घोषणा करण्यात आली आहे, बॅटरी बनवण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले, 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची घोषणा केली, LTCG वर सरचार्ज 15% पर्यंत मर्यादित करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी घोषणा :
शेतकऱ्यांना एमएसपीसाठी 2.7 लाख कोटींची घोषणा केली, शेतकरी ड्रोनला प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली, पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी 60 हजार कोटी देण्याची घोषणा केली.
सरकारी योजना :
ECLGS योजनेअंतर्गत 5 लाख कोटी कव्हर केले, पीएम हाउसिंग लोनसाठी 48,000 कोटींची तरतूद करण्याची घोषणा, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 80 लाख नवीन घरे बांधण्याची घोषणा केली, केंद्राच्या बरोबरीने राज्य कर्मचार्यांना NPS सूट देण्यात आली, आयकर नियमांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या, दंड भरून मागील 2 वर्षांचे आयटी रिटर्न अपडेट करण्याची संधी दिली.
आरोग्य :
अपंगांसाठी कर सवलतीचा प्रस्ताव आणला, राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली
क्रिप्टो :
क्रिप्टो गिफ्टिंग देखील कर आकर्षित करेल, क्रिप्टोच्या हस्तांतरणावरही कर आणला,
कस्टम ड्यूटी :
छत्रीवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांपर्यंत वाढली, इमिटेशन ज्वेलरीवर 400 /किलो कस्टम ड्युटी लावण्यात आली.