Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता....
Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता....
Union Budgt 2024: नव्या संसदेमध्ये अज्ञातांनी घुसखोरी करत गंधळ माजवल्यानंतर अनेक स्तरांतून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये असणारे खाचखळगे शोधत चिंता व्यक्त केली. याची गांभीर्यानं दखल घेत अखेर संसद भवन संकुलात अभ्यागतांच्या प्रवेशासाठी नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. हे बदल 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होतील. तीन टप्प्यांनमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. या अंतर्गत संसदेचं कामकाज पाहण्यासाठी व्हिजिटर्सना क्यूआर कोड घेणं अपेक्षित असेल.
कशी आहे संपूर्ण प्रक्रिया?
संसदेत येण्यापूर्वी व्हिजिटर्सना क्यूआर कोड आणि सदरील व्यक्तीच्या आधार कार्डची प्रिंट आउट आणावी लागेल. याच्या पूर्ततेनंतर प्रवेशासाठी इच्छुक व्यक्तींना स्मार्ट कार्ड दिले जाईल. टॅप आणि बायोमेट्रिक तपासणी केल्यानंतरच या व्यक्तींना संसदेत प्रवेश करता येणार आहे.
हेसुद्धा वाचा : हॅलो अजित पवार बोलतोय! उपमुख्यमंत्र्यांच्या फोननं PWD अधिकाऱ्यांना खडबडून जाग आणि पुढे...
प्रत्येक Visitar नं संसदेत जाताना त्यांचं स्मार्ट कार्ड जमा करणं अपेक्षित असेल. असं न केल्यास ते आपोआप ब्लॉक होऊन Black List मध्ये जाईल. परिणामस्वरुप त्या व्यक्तीला संसदेच्या आवारात प्रवेश नाकारला जाईल. संसदेतील गोंधळानंतरच्या सुरक्षा यंत्रणांनी हा निर्णय घेतल्यामुळं तातडीनं त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नेतेमंडळींचा प्रवेश कसा होणार?
अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या अर्थसंकल्पाच्या धर्तीवर हे मोठे बदल करण्यात आले असून, खासदारांनाही त्याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिथं, त्यांना फक्त एक पास मिळणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाससाठी अतिथी म्हणून संसदेत जाणाऱ्या इच्छुक व्यक्ती 31 जानेवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. इतकंच नव्हे, तर त्या दिवसासाठी व्हिजिटर गॅलरीसाठी खासदारांना फक्त एकच पाससाठी करता येणार आहे. त्यातही खासदारांच्या जोडीदाराला प्राधान्य दिलं जाणार असल्यामुळं आता उपस्थितांची संख्या मर्यादेत असून तपासणीही अधिक सावधगिरीनं पार पडणार आहे.
कोणता तपशील आवश्यक?
संसदेत खासदारांनी पाहुण्या किंवा भेट देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीसाठीच्या पब्लिक गॅलरी पासच्या अर्जासमवेत त्यांचा (त्या व्यक्तीचा) योग्य पत्ता, फोन नंबर आणि आधार कार्डची प्रत सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हिजिटर्स गॅलरीत जागा भरल्यास समोरचे पास तातडीनं बंद केले जातील शिवाय खासदार अंतरिम अर्थसंकल्पात गॅलरी पाससाठी फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात अशाही सूचना संबंधित यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. तेव्हा आता सुरक्षेच्या धर्तीवर करण्यात आलेल्या या बदलांनंतर संसदेत चुकीच्या मार्गानं कोणीही प्रवेश करू शकणार नाही हे निश्चित.