Nirmala Sitharaman Daughter Wedding : जेव्हाजेव्हा लग्न किंवा एखाद्या तत्सम समारंभाचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा थाटामाटात पार पडणारा सोहळा, छानछान वेशभूषेत असणारे नातेवाईक आणि आनंदाचा माहोल असंच वातावरण पाहायला मिळतं. किंबहुना भारतीय विवाहसोहळे जगभरात 'Big Fat Indian Wedding' म्हणूनही ओळखले जातात. ते म्हणजे या लग्नसोहळ्यांमध्ये असणाऱ्या आकर्षक व्यवस्थेमुळं. आतापर्यंत अनेकांनीच लग्नसोहळ्यांसाठी हजारो, लाखो आणि कोट्यवधींचा खर्च केल्याचंही आपण पाहिलं. पण, सध्या मात्र एका अशा लग्नाची चर्चा सुरु आहे जिथं किमान खर्चात कमाल आनंदाचे क्षण अनुभवल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा लग्नसोहळा होता खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या घराच अर्थात त्यांच्या लेकिचा. सितारमण यांच्याच घरी त्यांच्या लेकिनं लग्नगाठ बांधली. यावेळी मित्रपरिवार आणि जवळच्या नातेवाईकांची उपस्थिती पाहायला मिळाली. बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या या विवाहसोहळ्यासाठी कोणत्याही राजकीय चेहऱ्याची उपस्थिती पाहायला मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


हेसुद्धा वाचा : सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार? RBI ने केलं स्पष्ट



सितारमण यांच्या मुलीचा म्हणजेच परकला वांगमयी आणि प्रतीक यांचा विवाह ब्राह्मण पद्धतीनं पार पडला. जिथं उड्डपी अदामारू मठाच्या संतमंडळींनी नवविवाहित दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. लग्नसोहळ्याच्या वेळी ज्याप्रमाणे सर्वसामान्य वधुवरांवरच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात अगदी तसंच इथंही झाल्याचं पाहायला मिळालं. जिथे वधुनं पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीची साडी, नेसली होती तर वरानं पांढऱ्या रंगाचा पंचा आणि परिधान केला होता. यावेळी लेकिच्या लग्नाच्या वेळी निर्मला सितारमण यांनीसुद्धा मोलाकलमुरु साड़ी नेसल्याचं पाहायला मिळालं. 


सितारमण यांच्या लेकिविषयी थोडं... 


 Parakala Vangamayi चा जन्म 20 मे 1991 ला चेन्नईमध्ये झाला. आई, म्हणजेच निर्मला सितारमण या देशाच्या अर्थमंत्री म्हणून सेवेत असल्या तरीही त्यांची ही लेक सहसा प्रसिद्धीझोतापासून दूरच राहत असल्याचं पाहायला मिळालं आहे. दिल्ली विद्यापीठातून तिनं इंग्रदी साहित्यामध्ये Bachelor of Arts आणि Master of Arts असं उच्चशिक्षण घेतलं आहे. पदवी शिक्षणानंतर परकला काही वर्षांसाठी अमेरिकेत राहिली जिथं तिनं Master of Science in Journalism चं शिक्षणही घेतलं. मॅग्झिन आणि फोटोजर्नलिझम या क्षेत्रांत ती सक्रिय होती. सध्या ती एका राष्ट्रीय ख्यातीच्या वृत्तपत्रामध्ये senior correspondent म्हणून कार्यरत असून तिथं ती कला, जीवनशैली, तंत्रज्ञान असे विषय हाताळत असल्याचं म्हटलं जातं.