Kanjhawala Incident : कंझावला हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले चौकशीचे आदेश
Kanjhawala Incident : दिल्लीतल्या कंझावला हत्याकांडप्रकरणी (Kanjhawala) थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी चौकशीचे आदेश दिलेत.
Kanjhawala Incident : दिल्लीतल्या कंझावला हत्याकांडप्रकरणी (Kanjhawala) थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी चौकशीचे आदेश दिलेत. (Delhi Crime News) विशेष पोलीस आयुक्त शालिनी सिंह यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. शालिनी सिंह यांनी तपास टीमसोबत मध्यरात्री घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. हाती आलेलं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांवरुन तपास टीम आता गुन्ह्याची एक टाईमलाईन तयार करणार आहे.
कारची तरुणीच्या स्कुटीला धडक
तपासानंतर त्या आपला अहवाल गृहमंत्रालयाला सोपणवार आहेत. घटनेवेळी आरोपी दारुच्या नशेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 5 युवक असलेल्या कारने एका तरुणीच्या स्कुटीला धडक दिली होती. त्यानंतर तरुणीला जवळपास 13 किलोमीटर फरफटत नेल्यानं तीचा दुर्देवी मृत्यू झाला. ती नग्न अवस्थेत सापडली.. तर तिचा मृतदेहही छिन्नविछिन्न झाला होता.
हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतल्या कंझावला हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर येत आहे. मृत मुलीच्या स्कुटीवर आणखी एक मुलगी बसली होती, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जेव्हा कारने स्कुटीला धडक दिली तेव्हा ही मुलगीही जखमी झाली होती. पण घटनास्थळावरुन ही मुलगी आपल्या घरी गेली.
पण स्कुटीवरच्या मुलीचे पाय कारमध्ये फसले आणि ती फरफटत गेली अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिलीय. पोलिसांनी स्कुटीवर पाठीमागे बसलेल्या मुलीची ओळख पटवली आहे. लवकरच तिचा जबाब नोंदवणार असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नक्की काय आहे ही घटना?
Delhi Crime : नवीन वर्षाच्या सुरुवातीला राजधानी दिल्ली (delhi crime) एका घटनेने हादरली. स्कूटीवरुन घरी जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला कार चालकाने धडक दिली. ती तरुणी स्कुटीवरुन खाली पडली आणि कारच्या चाकात अडकली. त्या कार चालकाने गाडी न थांबवता यू-टर्न घेतला आणि तिला तब्बल 7 ते 8 किमी फरफटत नेले. या घटनेत 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली पोलीसांनी (delhi police) पाचही आरोपींना अटक आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
रविवारी दिल्लीत तीन वाजता पोलिसांना कंझावला परिसरात पीसीआर कॉल आला. रस्त्याच्या कडेला एक जखमी तरुणी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. शरीराचा बराचसा भाग रस्त्यावर घासून-घासून गायब झाला होता. दरम्यान या घटनेतील सीसीटीव्ही समोर आला असून कंझावला परिसरात एक तरुणी बलेनो कारच्या खाली अडकलेली दिसत होती. कार चालक तिला ओढून यू-टर्न घेताना दिसत आहे.