Kiren Rijiju Accident: केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्या कारला ट्रकने धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील (Jammu Kasmir) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून किरेन रिजिजू बचावले आहेत. किरेन रिजिजू एकदम सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मालाने भरलेला ट्रक वाहतूक कोंडीत अडकला होता. ट्रक रिव्हर्स घेत असतानाच किरेन रिजिजू यांच्या कारवर आदळला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


व्हिडीओत सुरक्षा अधिकारी जवान अपघातानंतर गाडीच्या दिशेन धाव घेताना दिसत आहे. यावेळी ट्रकने एका बाजूने स्कॉर्पिओला धडक दिल्याचं दिसत आहे. सुरक्षा कर्मचारी गाडीजवळ पोहोचल्यानंतर दरवाजा उघडतात आणि त्यानंतर किरेन रिजिजू बाहेर येताना दिसत आहेत. यानंतर ते आपण ठीक असल्याचं सांगताना दिसत आहेत.