बंगळुरु : कर्नाटकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. हा अपघात हावेरी जिल्ह्यात हालागिरी येथे झाला. एका ट्रकने हेडगे यांच्या ताफ्यातील गाडीला ठोकले. हा अपघात नसून मला ठार मारण्याचा प्रयत्न झालाय, असा दावा केंद्रीय मंत्री हेडगे यांनी केलाय. त्यामुळ याप्रकरणाला वेगळे वळण लागलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीयमंत्री अनंत कुमार हेगडे हे मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास रस्तामार्गे जात असताना हालागिरी येथे त्यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला. एका ट्रकने हेगडे यांच्या ताफ्यातील गाडीला धडक दिली.  दमम्यान, गाडीचे नुकसान झाले असून हेगडे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, माझ्याविरोधात हा कट असून मला ठार मारण्याचा प्रयत्न असल्याचे मत हेगडे यांनी यावेळी व्यक्त केले.


अपघाताच्यावेळी सुदैवाने मी ज्या गाडीत बसलेलो ती गाडी वेगात असल्यामुळे धडक टळली पण ताफ्यातील दुसऱ्या गाडीला ट्रक धडकला, असे हेगडे म्हणाले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. नासीर असे ट्रक चालकाचे नाव आहे. हेगडे यांनी अपघातानंतर घटनास्थळावरचा व्हिडिओ आणि अटक केलेल्या ट्रक चालकाचे फोटो टि्वटरवर पोस्ट केलेय.



ट्रकच्या धडकेत हेडगे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कारमधील काही जण जखमी झालेत. खांद्याला फॅक्चर झालेय. ही घटना अपघात नसून मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता. ड्रायव्हरने जाणीवपूर्वक माझ्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला, असे हेगडे म्हणाले.